‘माधवराव ढवळीकर ट्रस्ट’च्या वतीने उद्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानात ‘दीपोत्सव २०२१’ कार्यक्रम

‘दीपोत्सव २०२१’ या कार्यक्रमाला ६ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प्रारंभ होणार आहे. या वेळी श्रीकृष्ण पूजन, पाडवा आणि भाऊबीज साजरा केली जाणार आहे अशी माहिती श्री. मिथिल ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंदूंच्या विरोधानंतर गुरुग्राम (हरियाणा) येथे ३७ पैकी ८ सार्वजनिक ठिकाणची नमाजपठणाला दिलेली अनुमती रहित !

मुळात प्रशासनाने कुठलाही विचार न करता आणि जनतेला त्रास होणार नाही ना, हे न पहाता अनुमती दिलीच कशी, हा प्रश्‍न आहे. याला उत्तरदायी असणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात पुन्हा याचिका प्रविष्ट करणार ! – चित्रपट निर्मात्या रोशनी अली

हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणाच्या नावाखाली न्यायालयात याचिका करणारे धर्मांध स्वधर्माच्या सणांच्या वेळी होणार्‍या प्रदूषणाच्या वेळी गप्प का बसतात ?

सांखळी (गोवा) येथील संस्कृतीप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांकडून ‘गोवन वार्ता’ दिवाळी अंकाची जाहीर होळी करून निषेध व्यक्त

सांखळी येथील धर्मप्रेमी नागरिकांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ‘गोवन वार्ता’ या दैनिकाच्या दिवाळी अंकाची होळी करून निषेध व्यक्त केला.

सार्वजनिक सभांतून मतदानासाठी मतदारांना आमीष दाखवणारे वक्तव्य करणार्‍यांकडे निवडणूक आयोगाची डोळेझाक !

लोकहो, मतदारांना आमीष दाखवणार्‍यांना निवडणूक लढवण्यास आजन्म बंदी घालण्याविषयीचा कायदा करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरा !

प्रत्येक भारतीय दीपावलीच्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सैनिकांना कायम अनेक शुभेच्छा देत राहील ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर सैनिकांसमवेत साजरी केली दिवाळी करून भारतीय सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यासाठी शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी पाठवलेले पत्र ४ वर्षे गृहविभागातच पडून !

हिंदूंप्रती गृहविभागाची पराकोटीची असंवेदनशीलता ! अशा घटना अल्पसंख्यांक समाजाच्या संदर्भात घडल्या असत्या, तर अशीच असंवेदनशीलता दाखवली असती का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’