मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाकडून चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘फार्म हाऊस’वरील २ कोटी ३५ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त !

या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने अधिवक्ता राजकुमार राजहंस यांना मालाड येथून अटक केली आहे.

सांगली जिल्ह्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोविड योद्ध्यांचा ठाणे येथे सत्कार !

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात काम केलेल्या व्यक्ती, संस्था आणि रुग्णालये यांना सन्मानित करण्यात आले.

कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या ताकदीचे उदाहरण ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माझी अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडून साधू-संतांचा ‘चिलिमजीवी’ असा संतापजनक उल्लेख !

हिंदूंच्या साधूसंतांचा असा अवमान केल्याच्या प्रकरणी अखिलेश यादव यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना आतापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक करायला हवी होती !

कोलार (कर्नाटक) येथे हिंदु संघटनांनी घोषित केलेला ‘बंद’ यशस्वी !

. . . अशा मागण्या का कराव्या लागतात ? पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांना हे दिसत नाही कि ते आंधळे आणि बहिरे आहेत ? भाजपच्या राज्यात हिंदूंना असे निवेदन द्यावे लागू नये, असेच हिंदूंना वाटते !

भारतापासून नव्हे, तर अंतर्गत धार्मिक कट्टरतावाद्यांपासून पाकला धोका ! – पाकच्या मंत्र्याचे सुतोवाच

पाकला उशिरा का होईना हे लक्षात आले; मात्र पाक या धार्मिक कट्टरतावादावर कारवाई करू शकत नाही, हेही तितकेच सत्य आहे !

महाराजगंज (उत्तरप्रदेश) येथील महिला आणि पुरुष पुजारी यांची अज्ञातांकडून हत्या

उत्तरप्रदेशात आतापर्यंत अनेक पुजारी, महंत, साधू यांच्या हत्या झाल्या आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने याकडे गांभीर्याने पाहाण्याची आवश्यकता आहे !

गोमय आणि गोमूत्र यांचे सेवन केल्याने व्यक्तीचे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो !

एम्.बी.बी.एस्. डॉ. मनोज मित्तल यांचा शेण खात असल्याचा एक व्हिडिओ देशभरात प्रसारित होत आहे.  त्यात डॉ. मित्तल यांनी ‘गायीचे शेण आणि गोमूत्र यांचे सेवन केल्याने व्यक्तीचे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो’, असा दावा केला आहे.

चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान मोदी आता स्वीकारणार का ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा प्रश्‍न

भारत आणि चीन सीमा प्रश्‍नावरून गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. स्वामी केंद्र सरकारवर टीका करत आहेत. ‘नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला, चीन नाही’, असा दावाही त्यांनी यापूर्वी केला होता.

संसदेत कायदे रहित होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार ! – शेतकरी नेते राकेश टिकैत

तीन कृषी कायद्यांच्या विरोधातील हे आंदोलन तात्काळ मागे घेतले जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहू, जेव्हा कृषी कायदे संसदेत रहित केले जातील ! कायदे मागे घेणे, हा या आंदोलनात सहभागी झालेले आदिवासी, श्रमिक आणि महिला यांचा विजय आहे.