महाशिवरात्रीच्या दिवशी होणार्‍या पवित्र (शाही) स्नानानिमित्त अतिरिक्त रेल्वे गाड्यांची सुविधा नाही !

यापूर्वीच्या ४ पर्व स्नानांसाठीही अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या नव्हत्या; मात्र ११ मार्चच्या पवित्र स्नानाला संत आणि संन्यासी आखाडे उपस्थित असणार आहेत. त्यामुळे अधिक गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा अहवाल दाखवणार्‍यांनाच १० ते १२ मार्च या कालावधीत कुंभमेळ्यात प्रवेश

कुंभला येणार्‍या भाविकांकडे कुंभमेळ्याची नोंदणी आणि कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी नसणार्‍यांना रेल्वेस्थानक अथवा बसस्थानक यांच्या बाहेर सोडले जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महागाईमुळे व्हेनेझुएलाने छापली १० लाख रुपयांची नोट !

व्हेनेझुएलामध्ये राजकीय अराजक माजल्यामुळे देश संकटाच्या खाईत लोटला असून महागाईने परिसीमा गाठली आहे. अराजक माजल्यावर आर्थिक चलनाचे कसे अवमूल्यन होते, याचे हे उदाहरण होय !

विवाहितेचा सासरी झालेल्या छळाला पतीच उत्तरदायी ! – सर्वोच्च न्यायालय

भारतात विवाहानंतर प्रचलित प्रथेनुसार, पत्नी पतीच्या घरी रहायला जाते; परंतु सासरी एखाद्या महिलेला कुटुंबियांकडून मारहाण झाली, तर तिच्या दुखापतींसाठी मुख्यत: तिचा पतीच उत्तरदायी असेल, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी केली.

१३ आखाडे आणि १६ मठ यांना आयकर विभागाच्या नोटिसा

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील वर्ष २०१९ च्या कुंभमेळ्याच्या वेळी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचा हिशोब न दिल्यावरून आयकर विभागाने १३ आखाडे आणि १६ मठ यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

येत्या ५ दिवसांत हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये योग्य जागा आणि स्थान देऊन सन्मान करा !

हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंना अशी मागणी करावी लागते, हे लज्जास्पद ! भाजपच्या राज्यात हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंवर अशी मागणी करण्याची वेळ येणे, हिंदूंना अपेक्षित नाही !

कर्नाटकातील श्री मुकाम्बिका मंदिराच्या देवनिधीची मंदिर व्यवस्थापनाकडून कोट्यवधी रुपयांची लूट !

भारतभरातील बहुतांश सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचार होतो अथवा मंदिरांचे पावित्र्य राखले जात नसल्याचे उघड झाले असतांनाही ती सरकारीकरणमुक्त होत नाहीत, हे संतापजनक !

प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांचे ट्विटर खाते बंद !

भारताचा नव्याने सत्य इतिहास लिहिण्याची कृती सरकारी यंत्रणांकडून याआधीच होणे अपेक्षित होते; मात्र ते फ्रेंच पत्रकाराने केले, हे भारतीय यंत्रणेला लज्जास्पद, आता सरकारनेच ट्विटरला याचा जाब विचारून त्याची जागा दाखवून देणे आवश्यक !

महाराष्ट्राचा वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला.