पुणे येथे १५ म्हशींची अवैध वाहतूक करणारी गाडी गोरक्षकांनी पकडली !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – सातारा येथून सासवडमार्गे कोंढवा, पुणे येथे सादिक कुरेशीच्या खासगी पशूवधगृहात जनावरे कत्तलीसाठी एका ट्रकमधून नेण्यात येत आहेत, अशी माहिती गोरक्षक राहुल कदम यांना मिळाली. त्यांनी ती माहिती त्यांचे गोरक्षक सहकारी सुशील शिंदे, ऋषिकेश कामथे, प्रकाश खोले यांना दिली. त्यानुसार त्यांना जेजुरीकडून सासवडमार्गे जातांना तो ट्रक आढळला. गाडीची पहाणी केली असता १५ म्हशी आणि रेडे दाटीवाटीने बांधलेल्या स्थितीत आढळले. ट्रक आणि जनावरे असे मिळून एकूण ५ लाख ८० सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी वाहनचालक शिवलिंग माने आणि मेहबूब कुरेशी यांच्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका :

गोमांस आणि जनावरांची वारंवार होणारी अवैध वाहतूक लक्षात घेता कसायांना पोलिसांचे काहीच भय वाटत नाही, हे पोलिसांना लज्जास्पद !