अनेक वर्षांपासून भारतात रहात असल्याचा संशय, आरोपीकडून सर्व बनावट कागदपत्रे जप्त !
लोणी काळभोर (पुणे) – कोणतीही वैध कागदपत्रे नसतांना भारतामध्ये घुसखोरी करून काही दशकांपासून रहाणार्या एका ५० वर्षीय संशयित बांगलादेशी बोगस आधुनिक वैद्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आतंकवादविरोधी पथकाने थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये २४ डिसेंबर या दिवशी केली आहे. संशयित आरोपीचा जन्म बांगलादेशामध्ये झाला आहे. आरोपीने घुसखोरी करून भारतामध्ये प्रवेश मिळवला. प्रथम तो कोलकाता येथे राहिला. त्यानंतर देशातील विविध ठिकाणे फिरून तो थेऊर येथे वास्तव्यास आला. त्याने तिथे रुग्णालयही चालू केले होते.
याची माहिती मिळताच आतंकवादविरोधी पथकाने कारवाई करत त्याला अटक केली. आरोपीने भारतातील बनावट जन्म दाखला सिद्ध करून आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट (पारपत्र), रेशनकार्ड (शिधापत्रिका), मतदान कार्ड अशी सर्व बनावट कागदपत्रे सिद्ध केली होती. ती जप्त करण्यात आली आहे. (अशी बोगस कागदपत्रे कुणाकडून घेतली, याचेही अन्वेषण होणे आवश्यक आहे. असे असेल, तर बांगलादेशी घुसखोरांना शोधणे अतिशय कठीण आहे ! – संपादक) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :
|