पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची केंद्र आणि उत्तराखंड सरकारला चेतावणी !
हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंना अशी मागणी करावी लागते, हे लज्जास्पद ! भाजपच्या राज्यात हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंवर अशी मागणी करण्याची वेळ येणे, हिंदूंना अपेक्षित नाही !
पुरी (ओडिशा) – पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी लक्षात घ्यावे की, हरिद्वार येथे कुंभपर्व चालू आहे; मात्र आम्ही शंकराचार्य सरकारी स्तरावर उपेक्षित आहोत. आम्हाला योग्य ठिकाणी योग्य भूमी देण्याची कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही. अशी राजसत्ता तुमच्या शासनकाळात का आहे ? कि धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांचे नेतृत्वही तुम्हीच करू इच्छित आहात का ? असे समजत आहात का ? असा प्रश्न पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून उपस्थित केला आहे. ‘आमच्या विधानांकडे गांभीर्याने पहावे आणि पुढील ५ दिवसांत योग्य ठिकाणी जागा देण्याची व्यवस्था करावी’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.
(सौजन्य : Govardhan Math, Puri)
न्याय मिळाला नाही, तर ‘तुम्ही राज्य करण्याच्या योग्यतेचे नाहीत’, अशी घोषणा करू !
शंकराचार्यांनी पुढे म्हटले की, आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही, तर ‘तुम्ही राज्य करण्याच्या योग्यतेचे नाही’, असे आम्ही घोषित करू. तुमच्याविषयी आम्हाला आत्मीयता आहे; मात्र अशा प्रकारची उपेक्षा अपेक्षित नाही. आम्हाला योग्य भूमी आणि स्थान दिले गेलेले नाही. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी पदाधिकार्यांना विचारावे की, आमची उपेक्षा का केली जात आहे ? शंकराचार्यांची उपेक्षा म्हणजे आम्हाला विचार करण्यासाठी बाध्य केले जात आहे.