चुकीचे वर्णन करून मतपेटीचे राजकारण करणे ब्रिटीश खासदारांनी टाळावे ! – भारताने ब्रिटनच्या उच्चायुक्तांना सुनावले

ब्रिटिशांना भारतातून हाकलले; मात्र भारतावर अधिकार गाजवण्याची खुमखुमी त्यांच्यात अजूनही दिसून येते. ब्रिटनला समजेल, अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर दिले पाहिजे !

पाकिस्तानमध्ये गेल्यावर्षी अपहरण करण्यात आलेल्या ख्रिस्ती मुलीचा धर्मांतर करून विवाह

अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात अला. तिला दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले होते. तिच्याकडून घरची कामे करवून घेण्यात येत होती. नंतर तिचे धर्मांतर करून विवाह लावून देण्यात आला.

चिखली (जिल्हा बुलढाणा) येथील अनुराधा नागरी सहकारी बँकेत अपहार करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी

चौकशी समितीनेही तसाच खोटा अहवाल सिद्ध केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाई करून २ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम वसूल करावी.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील कोविड केअर सेंटर पुन्हा चालू करण्याचा निर्णय !

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेने कोरोना काळजी केंद्र (कोविड केअर सेंटर) चालू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

पुणे येथील ५ दुकानांना भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

पिंपरी अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पहाटे ५ वाजता शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही. रात्री दुकाने बंद असल्याने मोठी हानी टळली आहे.

योगतज्ञ रामदेवबाबा आणि अनिल अंबानी यांना दिलेल्या भूमींवर उद्योग कधी उभे रहाणार ? – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

योगतज्ञ रामदेव बाबांच्या पतंजली समूहाच्या ‘हर्बल अ‍ॅण्ड फूड पार्क’ला, तसेच उद्योगपती अनिल अंबानी यांना शासनाने नागपूर येथे दिलेल्या भूमीवर उद्योग कधी उभे रहाणार ?, असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत १० मार्च या दिवशी प्रश्‍नोत्तरात उपस्थित केला.

महाविकास आघाडी मराठी भाषा विद्यापिठाची स्थापना करेल ! – उदय सामंत, उच्चशिक्षणमंत्री

शासनाने मराठी भाषा विद्यापिठाची स्थापना करण्याचा निश्‍चिय केला आहे, असे निवेदन उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी १० मार्च या दिवशी विधान परिषदेत केले. 

पुणे येथील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर आक्रमण, ५ कोटींची हानी

हॅकरकडून बिटकॉईनची मागणी पुणे, १० मार्च – येथील पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर आक्रमण झाल्याचे समोर आले असून अज्ञात परदेशी हॅकरने बिटकॉईनची (ऑनलाईन चलन) मागणी केली आहे. रॅन्समवेअरने आक्रमण केल्याचे उघड झाले आहे. (रॅन्समवेअरमध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुमच्याकडे खंडणीची मागणी करतो. या प्रकारच्या सायबर … Read more

आंतरजातीय विवाह केला म्हणून जावयाला केला जिवे मारण्याचा प्रयत्न ! 

भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांनी मुलगी ऋतुजा हिने बंटी उपाख्य प्रशांत राजेंद्र वाघ याच्या समवेत आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

मराठी भवन मरीन ड्राईव्ह (मुंबई) येथे उभारणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मरीन ड्राईव्ह येथील जवाहरलाल बालभवन येथे मराठी भवन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली.