आता युरोपमधील स्वित्झर्लंडमध्येही मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी

स्वित्झर्लंडमध्ये मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र) घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मुलीची छेड काढणार्‍या तरुणाचा तिच्या नातेवाइकांकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू

छतरपूर (मध्यप्रदेश) येथील खांदिया गावात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने तिच्या आईने आणि काकाने आरोपीला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

वर्गात रागवल्याने त्याचा सूड घेण्यासाठी विद्यार्थ्याचा शिक्षकावर गोळीबार

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिदिन निघत असलेले धिंडवडे ! लहानपणीच साधनेचे संस्कार न केल्याचाच हा परिणाम आहे. याला आतापर्यंतचे शासनकर्तेच उत्तरदायी आहेत.

पुण्यातील गुंडांच्या टोळ्यांवर पोलिसांची कारवाई !

पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

८ मार्चच्या जागतिक महिलादिनी दोन महिलांनी ५१० कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले खेड्यामधील दारूचे दुकान !

महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात वावरत आहेत. समाजाला विनाशाच्या वाटेवर नेणार्‍या दारूचे दुकान खरेदी करून समाजाला मद्यपी बनवण्यासाठी महिलांनीही पुढाकार घेतला आहे, असे समजायचे का ?

सर्वोच्च न्यायालय ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणार्‍या राज्यांना नोटीस बजावणार !

मराठा आरक्षणाच्या प्रकरणी इतर राज्यांमध्येही ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिले गेले असून त्या राज्यांचाही यात समावेश करण्यात यावा’, अशी मागणी महाराष्ट्राकडून करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे.

नवी देहलीत झालेल्या इस्रायली दूतावासाजवळील बॉम्बस्फोटामागे इराणचा हात !

कालपर्यंत पाकसाठी देशद्रोही कारवाया करणारे आता इराणसाठीही देशद्रोही कारवाया करत आहेत ! पाकसमवेत आता इराणही भारतात सहजरित्या आतंकवादी कारवाया करू शकतो, हे भारताच्या गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षायंत्रणा यांना लज्जास्पद !

(म्हणे) ‘भारत आणि चीन मित्र असल्याने एकमेकांसाठी धोकादायक नाहीत !’ – चीनचे परराष्टमंत्री वांग यी

वांग यी यांनी म्हटलेले हे वाक्य अर्धसत्य आहे ! भारत चीनसाठी धोकादायक नाही; मात्र चीन भारतासाठी धोकादायक आहे. चीन कधीही भारताचा मित्र होऊ शकत नाही.

अलवर (राजस्थान) येथे पोलीस ठाण्याच्या परिसरात महिलेवर बलात्कार करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला अटक आणि बडतर्फीची कारवाई

अलवर (राजस्थान) येथे पतीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह याने त्याच्या रहात्या खोलीमध्ये त्याच्या एका साथीदारासह ३ दिवस बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला.

शीख तरुणाशी विवाह करणार्‍या मुसलमान तरुणीला सासरच्या घरातून पळवून नेण्याचा तिच्या कुटुंबियांचा प्रयत्न

फतेहगड साहिब (पंजाब) येथील मंडी गोबिंदगडमध्ये एका शीख तरुणाशी विवाह केलेल्या जम्मू-काश्मीरमधील मुसलमान तरुणीला तिच्या नातेवाइकांनी या तरुणाच्या घरातून उचलून नेण्याचा प्रयत्न केला.