गुरु पाठीशी असता कसलीच चिंता नाही ! – पंडित धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर धाम सरकार

झुरखेडा (जळगाव) येथे आयोजित बागेश्वर धाम सरकारच्या श्री हनुमान कथेला आरंभ !

झुरखेडा (ता. धरणगाव, जिल्हा जळगाव) – आयुष्यात गुरु असणे महत्त्वाचे आहे. गुरूंचा हात पाठीशी असला, तर कसलीच चिंता करण्याची आवश्यकता नाही. गुरूंचे जीवनात पुष्कळ महत्त्व आहे, असे मार्गदर्शन बागेश्वर धाम सरकारचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी हनुमान कथेच्या पहिल्या दिवशी केले. जळगाव जिल्ह्यातील झुरखेडा (ता. धरणगाव) येथे या ५ दिवसांच्या कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रथम दिवशीच सहस्रो भक्त कथा ऐकण्यासाठी येथे आलेले होते.

जातीभेद विसरून हिंदूंना जोडण्याचे पंडितजींचे कार्य वंदनीय ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठामंत्री, महाराष्ट्र

लहान मुलांपासून महिला, युवा आणि सर्वांना हिंदु धर्माचे मार्गदर्शन करणे, जातीभेद विसरून हिंदूंना एकत्र जोडणे, तसेच हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंना जागृत करणे, हे पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे कार्य वंदनीय आहे. याची आज नितांत आवश्यकता आहे.

हिंदु जनजागृती समितीचाही सहभाग !

कथेच्या ठिकाणी आयोजकांनी विविध समित्या सिद्ध करून जिल्ह्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच स्थानिक ग्रामस्थ यांना त्या वाटून दिल्या आहेत. यातील मुख्य मंडपामधील बैठक व्यवस्थेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रेमींचा सक्रीय सहभाग आहे. समितीच्या वतीने हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारा ‘सेल्फी स्टँड’ लावण्यात आला असून त्याला अनेक जणांनी भेट दिली. सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन, तसेच फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आलेले आहे.

हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारा ‘सेल्फी स्टँड’