तक्रारीनंतर प्रयागराज येथील मशिदीने भोंग्यांची दिशा पालटून आवाजही केला न्यून !

कुलगुरूंच्या तक्रारीनंतर पोलीस आणि प्रशासन अद्याप निष्क्रीयच ! मशिदींवरील भोंग्यांमुळे भारतातील कोट्यवधी लोकांना त्रास होत आहे; मात्र प्रशासन आणि पोलिस यांची शेपूट घालण्याच्या वृत्तीमुळे जनतेने तक्रार केल्यावरही कारवाई करण्याचे कुणाचेही धाडस होत नाही.

केरळमधील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात आयोजित उत्सवात धार्मिक विधी करण्यावर प्रशासनाकडून बंदी !

केरळमधील साम्यवादी सरकारच्या काळात हिंदूंच्या धार्मिक विधींवर बंदी घातली जाणे हा हिंदुद्वेषच होय ! अन्य धर्मियांच्या एखाद्या धार्मिक कृतीवर बंदी घालण्याचे धाडस साम्यवादी सरकार दाखवेल का ?

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या गावावर धर्मांध संघटनेचे आक्रमण : ८० घरांची तोडफोड

केंद्र सरकार परदेशातील विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंच्या रक्षणार्थ कधी कृती करणार ? सामाजिक माध्यमांतून हिंदूंकडून इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केले जात  असल्याचे सांगत हिंदूंवर आक्रमण करण्याचा हा धर्मांधांचा नवा जिहाद आहे का ?

कर्नाटक वक्फ बोर्डाकडून मशिदींना ध्वनीक्षेपक न लावण्याविषयी दिलेला आदेश मागे !

भोंग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानमुळे लोकांना होणारा त्रास सर्वश्रुत आहे आणि ते धर्मांधांनाही ठाऊक आहे; मात्र ते पोलीस, प्रशासन एवढेच काय, तर सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाहीत

बंगालमध्ये भाजपच्या खासदाराचे घर आणि कार्यालय यांवर १५ गावठी बॉम्बद्वारे आक्रमण

बंगाल म्हणजे गावठी बॉम्ब बनवण्याचा मोठा कारखाना झाला असून त्याच्या निर्मितीमध्ये तृणमूल काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते पुढे आहेत, अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत; मात्र याविरोधात स्थानिक पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा कृती का करत नाही ?

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे आयुक्त

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गोव्यात जनता कर्फ्यू आणि दळणवळणबंदी लागू करण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी नाकारली

गोवा राज्यात आणि देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात जनता कर्फ्यू आणि दळणवळण बंदी लागू करण्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाकारली आहे.

होळी आणि रंगपंचमी या उत्सवांमध्ये होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्गातील पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

कळंगुट येथे चालू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘सेक्स टॉय शॉप’ला प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यावर टाळे !

या गोष्टी पोलीस आणि प्रशासन यांना दिसत नाहीत का ? सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमे जागी आहेत म्हणून बरे आहे !

सिंधुदुर्गात शिमगोत्सवासाठी येणार्‍यांना कोरोनाविषयीची चाचणी करणे बंधनकारक

जिल्ह्याच्या बाहेरून येतांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे शक्य न झाल्यास नागरिकांनी जिल्ह्यात येताच त्याच दिवशी संबंधित गावातील जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे घशातील स्रावाची तपासणी (स्वॅब टेस्ट) करून घ्यावी.