बेंगळुरू येथील १६ मशिदींना ध्वनीप्रदूषणावरून कर्नाटक उच्च न्यायालयाची नोटीस !

मुळात यासंदर्भात जनतेला न्यायालयात जावे लागू नये ! पोलीस आणि प्रशासन बहिरे आहेत का ? जनतेला जे लक्षात येते ते यांच्या लक्षात का येत नाही ? कि ते मशिदींमळे शेपूट घालतात ?

म्यानमारमध्ये चिनी आस्थापनांना आग लावल्यामुळे सैन्याने केलेल्या गोळीबारात ५१ आंदोलक ठार

आतापर्यंत या आंदोलनामध्ये १२५ हून अधिक आंदोलक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. चिनी दूतावासाने या घटनेची गंभीर नोंद घेत त्यांच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे.

पाकमधील मंदिरांची तोडफोड करणार्‍या धर्मांधांना हिंदूंनी केली क्षमा !

पाकमधील हिंदूंची ही गांधीगिरी म्हणायची कि हतबलता ? पाकमधील हिंदू याव्यतिरिक्त आणखी काय करणार ? मंदिरांवर आक्रमण करणारे उद्या या हिंदूंवर आक्रमण करून त्यांना ठार करण्याची भीती असल्यानेच हिंदूंनी त्यांना क्षमा केली असावी !

वसीम रिझवी यांना इस्लाममधून बहिष्कृत करण्याची धर्मांधांची मागणी !

जातीपातींमुळे एखाद्याला बहिष्कृत केल्याची घटना एखाद्या खेडेगावात घडली, तर लगेच पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी संघटना तेथे धावून जातात आणि त्याचा विरोध करतात; मात्र अशा घटनांविषयी ते आणि भारतीय प्रसारमाध्यमे सोयीस्कर मौन बाळगतात !

अ‍ॅमेझॉनकडून अंतवस्त्रे आणि पायपुसण्या यांवर श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाचे चित्र !

अ‍ॅमेझॉन हा सराईत गुन्हेगाराप्रमाणे भारतासह विविध देशांची राष्ट्र आणि धर्म यांची प्रतीके असणार्‍या चिन्हांचा जाणीवपूर्वक अवमान करून त्यांचे मूल्य न्यून करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे !

देहली, केरळ आणि कर्नाटक येथील धाडीतून इस्लामिक स्टेटशी संबंधित ५ जिहाद्यांना अटक

अशांना कारागृहात ठेवून पोसण्यापेक्षा जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

वर्षाला ६ सिलिंडर विनामूल्य आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्‍वासन !

जनतेला लाच देऊन सत्ता मिळवणारे राजकीय पक्ष स्वतःच्या खिशातील नाही, तर जनतेचेच पैसे उधळत आहेत, हे लक्षात घ्या !

बेळगावमधील मराठी भाषिकांवरील अन्यायाच्या विरोधात सावंतवाडीत उद्या धरणे आंदोलन

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्‍न न्यायालयात प्रलंबित असतांना कन्नड भाषिकांनी चालवलेली मनमानी आणि अरेरावी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ते १९ मार्चपर्यंत मनाई आदेश लागू

जिल्ह्यामध्ये ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे यांस मनाई आहे.

मालवण येथे अवैध मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मासेमारांचे बेमुदत साखळी उपोषण चालू

३५ हायस्पीड ट्रॉलर्स अवैधपणे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी करत होते