ऐतिहासिक वास्तू खराब करणार्‍यांना ५ वर्षांपर्यंत शिक्षा ! – डॉ. नीलम गोर्‍हे

डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे – ऐतिहासिक वास्तू, गड-दुर्ग यांचे सौंदर्य खराब करणार्‍यांना आता ३ ते ५ वर्षांची शिक्षा होईल. नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सभागृहात हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी अल्प शिक्षा होती. त्यामुळे कुणावर धाक नव्हता. गड-दुर्ग यांचे सौंदर्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ही माहिती दिली. पुणे येथे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत डॉ. गोर्‍हे यांनी अधिवेशनात झालेल्या विविध निर्णयांची माहिती दिली.