१० मिनिटांच्या प्रवासासाठी २ सहस्र ८०० रुपये घेणारा टॅक्सीचालक अटकेत !

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रकार !

टॅक्सीचालकाने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली, याचा शोध घेऊन ते पैसे त्याच्याकडून वसूल करायला हवेत !

मुंबई – एक विदेशी भारतीय नागरिक डी. विजय यांची टॅक्सीचालक विनोद गोस्वामी याने २ सहस्र ८०० रुपयांची फसवणूक केली. १० मिनिटांच्या प्रवासात त्याने प्रवाशाकडून इतके पैसे उकळले. विजय हे ऑस्ट्रेलियात रहात असून मूळचे नागपूर येथील आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गोस्वामी याला अटक करून त्याचे वाहनही कह्यात घेतले. एका अधिकार्‍याने सांगितले की, विमानतळावर साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात केले असून २ दिवसांत विमानतळावर प्रवाशांकडून जास्त शुल्क आकारल्याने ९ कॅब चालकांवर कारवाई केली