गेल्या ७ वर्षांत सैन्यातील ८०० सैनिकांची आत्महत्या !

मानसिकदृष्ट्या सक्षम नसणारे सैनिक जनतेचे रक्षण तरी कसे करू शकणार ? सैनिक साधना करत नसल्याने ‘प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्थिर कसे रहायचे’, हे त्यांना ठाऊक नाही. त्यामुळे ते अशा प्रकारचे पाऊल उचलतात !

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत श्रीलंकेच्या विरोधातील प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी भारत अनुपस्थित !

पाक, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी शेजारी देशांतील हिंदूंना कुणीही वाली नाही. तसेच आता श्रीलंकेतील हिंदूंचीही स्थिती होणार आहे का ? भारत सरकारने श्रीलंकेतील तमिळी हिंदूंना आश्‍वस्त करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

पाकमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि धर्मांतर !

पाकमधील असुरक्षित हिंदू ! जगात कुठेही ज्यूंच्या विरोधात घटना घडली, तर इस्रायल त्यांच्या मागे ठामपणे उभा रहातो; मात्र हिंदूंच्या मागे कुणीही उभा रहात नाही, हे संतापजनक !

‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायद्याला आव्हान देणार्‍या याचिकेच्या विरोधात मशिदीच्या संरक्षकाकडून याचिका

मोगल आक्रमकांनी देशातील हिंदूंच्या सहस्रो मंदिरांवर अतिक्रमण करून त्यांची तोडफोड करून त्यावर नियंत्रण मिळवले आहे. धर्मांधांना अशा मंदिरांवरील नियंत्रण सोडावे लागणार असल्याने अशा प्रकारचा विरोध होत आहे.

(म्हणे) ‘होळी हा मद्यपान आणि अमली पदार्थ यांचे सेवन करण्याचा उत्सव !’

असे विधान अन्य धर्मियांच्या उत्सवाविषयी करण्याचे धाडस कुणी कधी प्रशासकीय अधिकारी दाखवत नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक असतात, हे लक्षात घ्या !

पाण्याची बचत करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून प्रारंभ केला पाहिजे ! – राजेंद्र म्हापसेकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद

पाण्याची बचत करणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात मोठे संकट आपल्यासमोर उभे रहाणार आहे. पाण्याचे स्रोत वाचवण्यासाठी पावसाचे पाणी भूगर्भात सोडणे आवश्यक आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीची धडक मोहीम चालू

सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी यांची वसुली करण्यासाठी नगरपरिषद पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करत आहेत.

तिलारी कालव्याला पाणी येत नसल्याने इन्सुली ग्रामस्थांचा शाखा अभियंत्याला घेराव

तिलारी धरणाच्या कालव्याचे काम चालू होऊन १५ वर्षे होत आली, तरी इन्सुली गावात अद्याप पाणी न आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

म्हादईचे पाणी वळवलेल्या जागेच्या पहाणीच्या निष्कर्षामध्ये तिन्ही राज्यांच्या अधीक्षक अभियंत्यांमध्ये एकमत नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्याच्या आरोपावरून गोवा शासनाने सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक शासनाच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस आणि इतर संस्था यांनी सक्रीयपणे कार्य करणे काळाची आवश्यकता ! – मुकेश कुमार मिना, पोलीस महासंचालक

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पर्यटक नियमांचे कठोरतेने पालन करत आहेत कि नाहीत हे पडताळण्यासाठी गोवा पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.