चीनचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्याविना तणाव असलेल्या ठिकाणांपासून भारतीय सैन्य माघारी फिरणार नाही ! – भारताने चीनला सुनावले

चीनवर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही, हेच यातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. भारताने अशीच सतर्कता बागळली, तरच चीनला जशास तसे उत्तर देता येईल !

गोपालगंज (बिहार) येथील विषारी दारूच्या प्रकरणी ९ जणांना फाशी, तर ४ महिलांना जन्मठेपेची शिक्षा

खजूरबानी येथे वर्ष २०१६ मध्ये विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू, तर ६ जण आंधळे झाल्याच्या प्रकरणी गोपालगंजमधील न्यायालयाने ९ आरोपींना फाशीची आणि ४ महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जामिनावर सुटलेल्या बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीने पीडितेला पेटवले !

हनुमानगड (राजस्थान) येथे बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका झाल्यावर त्याने पीडितेवर रॉकेल ओतून तिला पेटवले.

बंगालमधील बॉम्बस्फोटात भाजपचे ६ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ

बंगाल राज्याच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांवर अज्ञातांनी केलेल्या बॉम्बच्या आक्रमणात ६ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ झाले आहेत.

आम्हाला पाकसमवेत रहायचे नसून भारतात विलीन व्हायचे आहे !  

पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांची घोषणा : भारतानेही गांधीगिरी सोडत पुढाकार घेऊन पाकव्याप्त काश्मीर आता मुक्त करून भारताच्या नियंत्रणात आणले पाहिजे !

‘ओसीआय’ कार्डधारकांना तबलिगी किंवा मिशनरी यांसंदर्भात भारतात कार्य करायचे असल्यास अनुमती आवश्यक ! – केंद्र सरकारचा नवा नियम

ओसीआय कार्डधारक विदेशी नागरिकांना भारतात तबलिगी, मिशनरी अथवा पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करायचे असल्यास त्यांना ‘फॉरेन रिजनल रजिस्टे्रशन ऑफीस’कडून विशेष अनुमती घ्यावी लागणार !

हसुर बुद्रुकच्या (जिल्हा कोल्हापूर) उपसरपंचपदी पुरुषोत्तम साळोखे यांची बिनविरोध निवड

निवडीच्या वेळी सरपंच दिग्विजय पाटील, ग्रामसेवक गोविंद पवार, ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण निंबाळकर यांसह अन्य उपस्थित होते.

उपसभापतीपदाच्या निवडीनंतरच्या मिरवणुकीत कोरोनाच्या नियमांचे तीन-तेरा

लोकप्रतिनिधींना नियमांचे उल्लंघन करण्याचे भान न रहाणे हे लज्जास्पद आहे ! असे केल्यास सर्वसामान्य जनता नियमांचे पालन करेल का ?

ब्रेक तपासणी करतांना झालेल्या अपघातामध्ये मोटार वाहन निरीक्षक गंभीर घायाळ !

वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे दैनंदिन काम चालू असतांना हा अपघात घडला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.

मद्यधुंद अ‍ॅपे रिक्शा चालकाच्या धडकेने २ वर्षांची मुलगी ठार !

मद्यपान करणार्‍यास कितीही कठोर शिक्षा दिली, तरी अपघातातील हानी भरून निघणार नाही. पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.