न्यायाधिशांनी अनेक मास निकाल न देता खटला राखून ठेवणे, हा चिंतेचा विषय ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

न्यायाधीश १० महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता खटला राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय आहे, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.

कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे लाखो लिटर पाण्याच्या गळतीमुळे चाळीत पूरपरिस्थिती !

अशा कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! महाराष्ट्रात आधीच पाणीटंचाई आहे. अशा मानवी चुकांमुळे पाण्याची नासाडी झाली त्याचे काय ? ती कोण भरून काढणार ?

महाराष्ट्रातील १५० पैकी ४० ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याचे ‘सुराज्य अभियाना’च्या माहिती अधिकारातून उघड !

रस्ते अपघातांच्या वेळी रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, जेणेकरून अपघातग्रस्तांच्या मृत्यूंचे प्रमाण अल्प व्हावे, यासाठी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर १५० ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत मात्र यांतील ४० ट्रॅामा केअर सेंटर बंद आहेत.

Smart City Panjim : विरोध डावलून ‘स्मार्ट सिटी’ व्यवस्थापनाने जुने वडाचे झाड कापले

मनुष्याला प्राणवायू देणारी वडासारखी झाडे कापून बनवलेली स्मार्ट सिटी काय कामाची ?

गुढीपाडवा सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा संस्थानकडून ९ एप्रिल या दिवशी हिंदु नववर्ष शोभायात्रा !

गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडवा सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा संस्थानकडून कळंबोली येथे हिंदु नववर्ष शोभायात्रेचे आयोजन केले आहे. ही भव्य शोभायात्रा ९ एप्रिल या दिवशी सकाळी ८ वाजता तरंग सोसायटी ..

‘सीव्हिजील ॲप’वर आतापर्यंत ३० तक्रारींची नोंद !

निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केलेल्या घटनेची तक्रार करण्यासाठी नागरिकांसाठी ‘सीव्हिजील ॲप’ चालू केले आहे.

हिंदु नववर्ष स्वागत समितीकडून ९ एप्रिल या दिवशी स्वागत यात्रेचे आयोजन !

शोभायात्रेत महिला दुचाकी पथक, लेझीम पथक, लाठीकाठी पथक, ध्वज पथक, सायकल पथक, चित्ररथ, मृदुंग टाळ आणि भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय आणि विविध संघटना सहभागी होणार आहेत. ‘आपण सर्वांनी मित्र परिवारासह पारंपरिक वेषात सहभागी व्हावे’, असे आव्हान समितीने केले आहे

दीड सहस्रांहून अधिक सरकारी कर्मचार्‍यांनी शिधावाटप केंद्रांतील धान्य चोरले !

जनतेसाठी असलेले धान्य हडप करणार्‍या अशा सरकारी कर्मचार्‍यांमुळेच सरकारच्या योजना गरिबांपर्यंत पोचण्यास अडथळे येतात. या कर्मचार्‍यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरातील श्री गणपतीची मूर्ती विधी न करता हटवल्याचा भाविकांना संशय !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !

पिण्याच्या पाण्यासाठी जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश !