Gujarat Teen Raped By Teacher : गुजरातमध्ये दहावीच्या विद्यार्थीनीवर शाळेतील शिक्षकाने केला बलात्कार !

कर्णावती (गुजरात) – गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील एका शाळेतील ३३ वर्षीय नराधम शिक्षकाने वाढदिवस साजरा करण्याचे आमीष दाखवून पीडित विद्यार्थिनीला हॉटेलवर बोलावले आणि तिथे दहावीच्या परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. याविषयीच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. (असे शिक्षक विद्यार्थ्यांवर नीतीमत्तेचे संस्कार काय करणार ? शाळेसारख्या विद्येच्या मंदिरात असे शिक्षक निपजणे हे शिक्षणक्षेत्राच्या नैतिक अध:पतनाचे लक्षण आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही ! – संपादक)

दहावीतील या पीडित विद्यार्थीनीने २६ जानेवारी या दिवशी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विषयावर शाळेत भाषण दिले होते; मात्र काही दिवसांतच तिच्यावर शाळेतील शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, ती एक चांगली विद्यार्थिनी असून अभ्यास आणि शिस्त यांविषयी ती अतिशय काटेकोर आहे. २६ जानेवारी या दिवशी तिने अतिशय अभ्यासपूर्ण असे भाषण दिले होते. (मुख्याध्यापकांनी मुलीचे कौतुक करून न थांबता आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

असे बलात्कारी शिक्षक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक !