Jagadguru Narendracharyaji maharaj : महायुतीचा विजय ‘लाडकी बहीण योजने’मुळे नव्हे, तर साधू-संतांमुळे ! – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज

रत्नागिरी – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला अभूतपूर्व विजय हा ‘लाडकी बहीण योजने’मुळे नसून साधू-संत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामुळे मिळाला आहे, असे विधान जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. रत्नागिरीत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या निवडणुकीत भाजपने २८८ जागांपैकी १३२ जागा जिंकल्या. शिवसेनेला ५६, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ४१ जागा मिळाल्या.


या वेळी महाराज म्हणाले की,

१. राजकीय लोक आमचा आवाज दाबतात. त्यामुळे त्यांना घाबरून चालणार नाही. राजकीय उलथापालथ करणे आवश्यक आहे. हिंदूंचे रक्षण न केल्यास आम्ही तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचू शकतो, हा संदेश जनतेने राजकीय लोकांपर्यंत पोचवायला हवा.

२. स्वतः अजित पवार यांनाही त्यांच्या १० ते १२ जागा येतील, याची निश्‍चिती नव्हती. एकनाथ शिंदे यांना वाटते की, लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना मोठा विजय मिळाला; पण तसे नाही.

३. मुसलमान समाज हिंदूंना संपवण्यासाठी हिरवे झेंडे घेऊन उभा रहात असेल, तर हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. संतांनी जागृत झाले पाहिजे. आम्ही ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केले. त्यातून विधानसभेच्या निवडणुकीत चित्र पालटलेले दिसले. देहली विधानसभा निवडणुकीतील चित्रही त्यामुळेच पालटले.

४. महाकुंभपर्वात एक चांगली गोष्ट झाली. आम्ही ‘डरेंगे तो मरेंगे’ (घाबराल तर मराल) हा संदेश दिला. त्यातून सगळे संत जागृत झाले. आमचे शंकराचार्य महाकुंभपर्वापासून दूर रहायचे; पण त्यांनाही त्यात उतरावे लागले. यातून पुष्कळ मोठी जनजागृती झाली.’