US Floods : अमेरिकेत पुरामुळे १४ जणांचा मृत्यू

काही भागांत कडाक्याची थंडी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. केंटकी, जॉर्जिया, व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया, टेनेसी आणि इंडियाना या ६ राज्यांना पुराचा तडाखा बसला आहे. केंटकी राज्यात १२ लोकांचा मृत्यू झाला, तर पश्चिम व्हर्जिनिया आणि जॉर्जिया या राज्यांमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांमधील सुमारे ९ कोटी लोकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागत आहे. तापमान विक्रमी पातळीवर घसरले आहे, शाळा बंद आहेत, पाईप फुटले आहेत. १४ सहस्रांहून अधिक घरांमध्ये वीज खंडित झाली आहे आणि १७ सहस्र ठिकाणी पाणीपुरवठा थांबला आहे. मध्य पश्चिमेतील काही भागात तापमान उणे ५० ते उणे ६० अंशांपर्यंत पोचले आहे.