कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नसल्याचा दावा !
मुंबई – औरंगजेबाची खुलताबाद येथे असलेली कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे ती हटवण्याचे आदेश भारतीय पुरातत्व विभागाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली आहे. याखेरीज भाग्यनगरचा (हैदराबादचा) निजाम असफ जाह पहिला आणि औरंगजेबाचा मुलगा अन् मुलगी यांच्या दर्ग्यात असलेल्या इतर कबरीही पाडण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे आदेश सरकारला देण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
याचिकेतील महत्त्वपूर्ण सूत्रे !
१. औरंगजेबाच्या कारकीर्दीचा काळ हा भारतीय इतिहासातील एक काळे पान आहे. या काळात हिंदु महिलांवर अत्याचार करण्यात आले, हिंदु मंदिरांचा विनाश करण्यात आला.
२. या कबरीपासून पुढल्या पिढीने वारसा म्हणून काही घ्यावे किंवा शिकवण घेण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे या कबरीला ऐतिहासिक वारसा वास्तू किंवा राष्ट्रीय स्मारक यांच्या सूचीतून वगळण्यात यावे.
३. औरंगजेबासह या व्यक्तींना भारतीय इतिहासात राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्व नाही आणि त्यांचा भारतीय समाजावर कोणताही महत्त्वपूर्ण प्रभाव पडलेला नाही.
संपादकीय भूमिकामुळात अशी मागणी करण्याची वेळच येऊ नये, सरकारनेच कृती केली पाहिजे, अशीच हिंदूंनी अपेक्षा आहे ! |