आसाममध्ये रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

अंनिसवाल्याने असे हिलींग सेंटर्स दिसत नाहीत का ?

मिजोराम पोलिसांच्या गोळीबारात आसामचे ६ पोलीस ठार, तर ५० हून अधिक घायाळ !

देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होत असतांना भारतात अजूनही राज्यांतील सीमावाद चालू असून त्यात पोलिसांचे नाहक बळी जाऊ देणे, हे भारताला लज्जास्पद ! यास आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत, हे लक्षात घ्या !

आसाममध्ये मंदिरांपासून ५ कि.मी.च्या परिसरात गोमांसाची खरेदी आणि विक्री यांवर बंदी येणार !

आसाम राज्य असा कायदा करू शकते, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !

आसाम शासनाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या पत्नीला अडीच लाख रुपयांचे साहाय्य !

राज्यातील ८७३ विधवांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, असे एका पहाणीत आढळून आले आहे. या सर्वांना पुढील आठवड्यापर्यंत धनादेश दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मंदिर, मठ आदी ठिकाणांपासून ५ किमी परिसरात गोमांसाच्या खरेदी अन् विक्री यांवर बंदी येणार !

आसाम राज्य असा कायदा करू शकतो, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !

बहुतेक धर्मांचे लोक हिंदूंचे वंशज ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

त्यामुळे हिंदुत्वाला हटवले जाऊ शकत नाही. तसे करणे याचा अर्थ आपली मुळे आणि मातृभूमी यांपासून दूर जाण्यासारखे आहे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका पत्रकार परिषदेत केले.

बलात्काराचा आरोपी पळ काढत असल्यास पोलिसांना गोळीबार करावाच लागेल ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

‘गुन्हेगार पळून जात असेल, तर असे (गोळीबार करण्यासारखे ) ‘पॅटर्न’ असायला हवे’, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी पोलिसांच्या बैठकीत सांगितले.

आसाममधील मुसलमानांच्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी ८ गट स्थापन करून उपाय मागवणार !

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा हेच यावरील मुख्य उपाय आहेत. ते करण्यासाठी आसाम सरकारने केंद्रशासनाला सांगावे, असेच हिंदूंना वाटते !

मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली १५० मुसलमान नेत्यांशी चर्चा !

चर्चेद्वारे हा प्रश्‍न सुटेल, अशी अपेक्षा करता येत नाही. त्यासाठी समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा करणेच आवश्यक आहे !

आसाममध्ये सरकारी योजनांसाठी २ अपत्ये धोरणाची कार्यवाही करणार ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

या धोरणाची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली. केंद्रशासनाच्या योजनांमध्ये हे धोरण लागू होणार नसल्याचेही मुख्यमंत्री सरमा यांनी स्पष्ट केले.