बालिकाही असुरक्षित !

पुणे येथे ३ वर्षांच्या मुलीवर ९ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केला. ३ वर्षांची मुलगी ‘दादा’, ‘दादा’ म्हणत ज्या मुलासमवेत खेळत होती, त्याच मुलाकडून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर त्या बालमनावर काय बेतले असेल…

Alleged Demolition Of Hanuman Temple : मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी हनुमान मंदिर पाडले !

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुरेश कुमार कैट यांच्यावर सरकारी गृहनिर्माण संकुलातील हनुमान मंदिर पाडल्याचा आरोप केला आहे.

गावाबाहेरील मुसलमानांना नमाजपठणास बंदी !

खोणी गावातील ग्रामस्थांना कुणी ‘असहिष्णु’ म्हणून हिणवले, तर आश्‍चर्य वाटणार नाही. असा निर्णय घेण्याची वेळ ग्रामस्थांवर का आली, याची विचार पोलीस, प्रशासन आणि सरकार यांनी करणे आवश्यक !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नित्यपूजेची पुढील ३ महिन्यांची आगाऊ नोंदणी पूर्ण !

देशभरात कुठेही असणार्‍या भाविकांना घरी बसून श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीची ऑनलाईन पद्धतीने पूजा नोंदणी करण्याची सुविधा मंदिरे समितीने उपलब्ध करून दिली आहे. यात प्रामुख्याने नित्य, पाद्य आणि तुळशीपूजेची ‘ऑनलाईन नोंदणी’ चालू करण्यात आली.

Mass Fish Death In Pune River : मुळा-मुठा नदीमध्ये रसायनमिश्रीत दूषित पाणी आल्याने सहस्रो माशांचा मृत्यू !

गणेशोत्सवाच्या वेळी मूर्ती विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होते, असे म्हणणारे कथित पर्यावरणप्रेमी याविषयी काही बोलणार आहेत का ?

J&K No Burqa In Court : न्यायालयात युक्तीवादासाठी मुसलमान महिला अधिवक्ता बुरखा घालून आल्याने न्यायालयाने नियमांची करून दिली जाणीव !

नियमांचे उल्लंघन करून अशी कृती करणार्‍यांची पदवीच काढून घेण्याचा कायदा केला पाहिजे !

श्रीराममंदिरासाठीची संघर्षगाथा लवकरच दूरदर्शनवर !

श्रीराममंदिराच्या निर्मितीसाठी हिंदूंच्या ५०० वर्षांच्या संघर्षाची गाथा लवकरच दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहे. यासाठी ‘श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडून ५ भागांचा लघुपटही बनवण्यात आला आहे. यातील प्रत्येक भाग हा ३० ते ४० मिनिटांचा असेल.

Mahakumbh Punya Kshetra Yatra : प्रयागराज, अयोध्या आणि काशी येथे जाण्यासाठी रेल्वे विभागाकडून विशेष यात्रेचे आयोजन !

प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून चालू होणार्‍या महाकुंभपर्वानिमित्त रेल्वे विभागाने भाविकांना प्रयागराज, अयोध्या आणि काशी येथे जाण्यासाठी ‘महाकुंभ पुण्य क्षेत्र यात्रा’ नावाच्या विशेष यात्रेचे आयोजन केले आहे.

Prayagraj Police Training : कुंभपर्वात भाविकांशी कसे वागावे ?, याचे उत्तरप्रदेश पोलिसांना विशेष प्रशिक्षण !

महाकुंभपर्वात भाविकांच्या सुरक्षेचे सर्वांत मोठे दायित्व पार पाडणार्‍या पोलिसांना सर्वार्थाने कर्तव्यदक्ष बनवण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने कंबर कसली आहे. पोलिसांना शारीरिक सक्षमतेसह मानसिक स्तरावरही सक्षम करण्यासाठी त्यांच्यासाठी लिखित परीक्षा घेतली जात आहे.

भैरवनाथ आणि देवांचा प्रदक्षिणा सोहळा उत्साहात पार पडला !

गोडोली येथील श्री भैरवनाथ आणि श्री जोगेश्वरीदेवीची ग्रामप्रदक्षिणा मोठ्या उत्साहात पार पाडली. सहस्रो भाविकांनी या मंगल सोहळ्यासाठी गर्दी केली होती. गोडोली येथील श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे.