धुपखेडा (जिल्हा संभाजीनगर) येथील साई मंदिरात चोरी

संभाजीनगर-पैठण रस्त्यावरील धुपखेडा येथील प्रसिद्ध असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरात २३ नोव्हेंबरच्या पहाटे चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली. यामध्ये साईबाबांच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट, २ दानपेट्या आणि मंदिराच्या कपाटातील सोन्या-चांदीचे अलंकार चोरट्यांनी पळवले आहेत.

आझमगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

आझमगड जिल्ह्यातील शेखपुरा कबीरूद्दीनपूर या गावातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली.

मंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात विविध स्तरांवर अभियानही राबवत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्व मंदिरांचा कारभार भक्तांकडे असेल !

शिर्डी संस्थानने मुदत ठेवींतून कर्मचार्‍यांचे वेतन दिले, तर तिरुपती देवस्थानही त्याच विचारात !

दळणवळण बंदीमुळे मंदिरांत अर्पण येणे बंद झाल्याचा परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सर्वच पैसा संबंधित सरकारे घेऊन जात असल्याने मंदिरांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !

सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्यामागील वस्तूनिष्ठ इतिहास

१३.५.२०२० या दिवशी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ५५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने…