पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून १० सहस्र विनाशिरस्त्राण वाहनचालकांवर कारवाई !

शिरस्त्राणाविना दुचाकी चालवल्याच्या प्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुण्यातील १० सहस्र वाहनचालकांवर कारवाई केली. यातून ४४ लाख ५७ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई ‘आर्.टी.ओ.’च्या ‘वायुवेग पथका’ने १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२४..

विधानसभा निवडणुकीतील निकालाच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार ! – विक्रम सावंत, माजी आमदार

विक्रमसिंह सावंत म्हणाले की, महायुतीच्या उमेदवारांना लाखांहून अधिक मते, तर ३६ सहस्रांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. जत शहरासह तालुक्यातील ६७ गावांत मताधिक्य १०० टक्के मिळणे अपेक्षित असतांना अवघ्या ६ गावांत किरकोळ मताधिक्य मिळाले आहे.

वाहन चालवण्याचा पक्का परवाना काढण्यात पुणेकर ‘अनुत्तीर्ण’ !

एप्रिल २०२४ पासून २२ नोव्हेंबर या दिवसापर्यंत १ लाख ८३ सहस्र ५४७ जणांनी ऑनलाईन शिकाऊ परवाने प्राप्त केले आहेत; मात्र पक्का परवाना करण्याच्या चाचणीमध्ये केवळ ८५ सहस्र ५६० वाहनचालक उत्तीर्ण झाले आहेत.

पुणे येथे शारीरिक अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलाची आत्महत्या !

मुलांवर सुसंस्कार असणे किती आवश्यक आहे ? हे यावरून सिद्ध होते. भावी पिढी जर अशी होत असेल, तर राष्ट्राचे भवितव्य कसे असेल ? याचा विचारच न केलेला बरा !

सत्तास्थापनेसाठी महायुतीच्या नेत्यांची अमित शहा यांच्यासमवेत होणार बैठक !

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी २८ नोव्हेंबर या दिवशी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या प्रमुखांची भाजपचे वरिष्ठ नेते अन् केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत देहली येथे बैठक होणार आहे

कात्रज भागातील सराफी पिढीवर दरोडा टाकण्याच्या सिद्धतेतील चोरटे पोलिसांच्या कह्यात !

कात्रज भागातील सराफी पिढीवर दरोडा टाकण्याच्या सिद्धतेत असणार्‍या चोरट्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांच्या समवेत असलेल्या ३ मुलांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी महायुती म्हणून घेतलेली भूमिका पुष्कळ मोठी ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करून त्यांचे आभार मानले आहेत.

हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या विद्यार्थ्याची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली !

हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला धमकावून त्याच्या गळ्यातील ३५ सहस्र रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली.

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय मान्य असेल, असे घोषित केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाने भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन दिले आहे.

मराठीत बोलणार्‍या प्रवाशाला रेल्वे तिकीट नाकारले !

मराठीबहुल महाराष्ट्रातील मराठी भाषिकांवर होणारा हा अन्याय रोखण्यासाठी मराठीप्रेमी जनतेने एकत्र यायला हवे !