पाकिस्‍तानात इम्रान खान समर्थकांचे आंदोलन स्‍थगित !

प्रतिकात्मक छायाचित्र

इस्‍लामाबाद – इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्‍तान तेहरीक-ए-इन्‍साफ’ने (‘पीटीआय’ने) त्‍याचे आंदोलन तात्‍पुरते स्‍थगित केले आहे. ‘इम्रान खान यांच्‍या सल्‍ल्‍याने  पुढील निर्णय घेतला जाईल’, असे ‘पीटीआय’ने म्‍हटले आहे. ‘पीटीआय’ने एका प्रसिद्धीपत्रकात म्‍हटले आहे की, सरकार नि:शस्‍त्र नागरिकांना क्रूरपणे मारण्‍यास सिद्ध  आहे. इस्‍लामाबादला कत्तलखाना बनण्‍यापासून रोखण्‍यासाठी ते त्‍यांचे शांततापूर्ण आंदोलन तात्‍पुरते स्‍थगित करत आहेत.

इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी आणि खैबर पख्‍तूनख्‍वाचे मुख्‍यमंत्री अली अमीन हे गंडापूर निदर्शनाचे नेतृत्‍व करत होते. त्‍यांनी आंदोलकांना घरी जाण्‍यास सांगितले होते. अटकेच्‍या भीतीने दोघेही पळून गेल्‍याचे गृहमंत्री मोहसीन नक्‍वी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इम्रान खान यांच्‍या सुटकेसाठी २४ नोव्‍हेंबरपासून पाकिस्‍तानमध्‍ये निदर्शने चालू झाली होती. ३ दिवस चाललेल्‍या या आंदोलनात किमान ७ जणांना जीव गमवावा लागला. पाकिस्‍तान पोलिसांनी ५०० हून अधिक आंदोलकांना अटक केली आहे.