मशिदी मुसलमान आणि चर्च ख्रिस्ती चालवतात; मग हिंदूंना मंदिरे चालवण्याचा अधिकार का नाही ? – केरळचे भाजप अध्यक्ष के. सुरेंद्रन्

सुरेंद्रन् यांनी एवढे बोलून न थांबता, त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला मंदिरे सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी लावून धरणे आवश्यक !  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन्

त्रिशूर (केरळ) – केरळमध्ये मशिदींवर मुसलमान आणि चर्चवर ख्रिस्ती लोकांचे अधिकार असतात. तथापि हिंदूंना इतर धर्मांइतके अधिकार मिळत नाहीत. केरळमधील हिंदूंना मंदिरे चालवण्याचा अधिकार का नाही ?, असा प्रश्‍न भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी त्रिशूर भाजप जिल्हा समितीच्या बैठकीचे उद्घाटन करतांना केला.

सुरेंद्रन् पुढे म्हणाले की, शबरीमला येथील धार्मिक विधी काय असावेत, याचा निर्णय घेण्याचा अधिकार केरळ सरकारने न्यायालयाला दिला. बहुसंख्य समुदायावर लादलेली धर्मनिरपेक्षता इतर धर्मांसाठी नाही. मार्क्सवादी आणि काँग्रेस या दोन्ही राजकीय आघाड्यांचे नेते मानसिक संतुलन गमावल्यासारखे वागत आहेत.