नवी देहली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या २७ नोव्हेंबरच्या दुसर्या दिवशी पुन्हा गदारोळ झाल्याने कामकाज २८ नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले. विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभा येथे गौतम अदानी यांच्या प्रकरणी गदारोळ घातल्याने कामकाज स्थगित करण्यात आले. अदानी उद्योग समुहावर अमेरिकेतील सरकारी अधिवक्त्यांनी २ सहस्र कोटी रुपयांच्या लाचखोरीचा आरोप करत पोलिसांत तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यावर चर्चा करण्याची मागणी विरोधक करत होते.
संपादकीय भूमिकाजनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करून चालवण्यात येणार्या संसदेचे कामकाज गदारोळ करून स्थगित करण्यास भाग पाडणार्यांकडून हा पैसा वसूल का केला जात नाही ? आता जनतेनेच यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक आहे ! |