बेकायदेशीरपणे कमावलेले १६८ कोटी रुपयेही जप्त होणार !
बीजिंग (चीन) – भ्रष्टाचाराच्या संदर्भात कठोर असणारा चीन सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग वर्ष २०१२ मध्ये सत्तेवर आल्यापासून अधिकच कठोर झाला आहे. तेथे भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या अंतर्गत लाखो अधिकार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यांत २ माजी संरक्षणमंत्री आणि अनेक वरिष्ठ सैनिकी अधिकारी यांनाही अलीकडेच शिक्षा सुनावण्यात आली. आता ‘बँक ऑफ चायना’चे माजी अध्यक्ष लियू लियांग यांना भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कर्ज दिल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
१. चीनच्या शॅन्डॉन्ग प्रांतातील जिनान शहरातील न्यायालयाने लियू यांना १२.१ कोटी युआन (अनुमाने १६८ कोटी रुपये) लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी दोषी ठरवले. तसेच त्यांनी पात्र नसलेल्या आस्थापनांना ३.३२ अब्ज युआन (अनुमाने ४ सहस्र ६२० कोटी रुपये) अवैध कर्ज दिले. यामुळे सरकारला अनुमाने १९०.७ दशलक्ष युआनचा (अनुमाने २७० कोटी रुपयांचा) अधिक फटका बसला.
२. भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाल्यामुळे लियू यांची सर्व मालमत्ता जप्त केली जाईल. तसेच त्यांनी जे काही बेकायदेशीरपणे कमावले आहे, ते जप्त केले जाईल आणि राज्याच्या तिजोरीत जमा केले जाईल.
संपादकीय भूमिकाभारतातील अनेक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी हे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असतांना त्यांच्यावर अशी कारवाई कधीच होत नाही ! भारतासाठी हे लज्जास्पद ! |