मुंबईमधील नाहूर रेल्वेस्थानकातील प्रकार
मुंबई – प्रवासी अमोल माने नाहूर स्थानकात लोकलचे तिकीट काढण्यासाठी गेले होते. ते तेथील कर्मचार्याशी मराठी भाषेत बोलले; पण कर्मचार्याने ‘हिंदीत बोला’, असे सांगितले. ‘मी मराठीतच बोलणार’, असा आग्रह माने यांनी केला. तेव्हा कर्मचार्याने उद्धटपणे बोलण्यास प्रारंभ केला आणि तिकीट देण्यास नकार दिला. या वेळी माने यांनी या घटनेचे चित्रीकरण केले. ‘मराठी एकीकरण समिती’ने याविषयीचा व्हिडिओ ‘फेसबुक’वर प्रसारित केला होता. या प्रकरणी कर्मचार्याच्या विरोधात रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. ‘या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणीही ‘मराठी एकीकरण समिती’ने केली आहे.
संपादकीय भूमिकामराठीबहुल महाराष्ट्रातील मराठी भाषिकांवर होणारा हा अन्याय रोखण्यासाठी मराठीप्रेमी जनतेने एकत्र यायला हवे ! |