बेळगावमधील १६ मंदिरांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाच्या विरोधात श्रीराम सेना हिंदुस्थानची निदर्शने

बेळगाव शहरासह जिल्ह्यातील १६ मंदिरांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या या निर्णया विरोधात श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

लोकांनी थुंकू नये; म्हणून जिन्यात लावलेल्या हिंदु देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा तात्काळ काढा ! – श्रीराम सेनेचे निवेदन

एका इमारतीत असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेत जातांना जिन्यात लोकांनी थुंकू नये म्हणून हिंदु देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे देवतांची विटंबना होत आहे आणि समस्त हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत….

श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत वाढ

श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ करण्यात आली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांच्या अहवालाच्या आधारे १० नोव्हेंबरपासून प्रवेशबंदीत वाढ केली आहे.