श्री जगन्नाथपुरी मंदिराची ३५ सहस्र एकर भूमीची ओडिशा सरकार विक्री करणार !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर आतापर्यंत जे होत आले आहे, तेच श्री जगन्नाथपुरी मंदिराच्या संदर्भात होत आहे ! अशा घटना रोखण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवून भक्तांना सोपवणे आवश्यक आहे अन्यथा मंदिरांची भूमी, संपत्ती सर्व काही सरकार विकून मोकळी होईल !

एक मासात इस्लामी अतिक्रमणे हटवून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार !

विशाळगडावरील ‘रेहानबाबा’ दर्ग्याला शासकीय खिरापत, तर मंदिरे अन् बाजीप्रभु यांचे स्मारक यांकडे शासनाचा कानाडोळा ! एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी !

नांदगाव शिंगवे (जिल्हा नगर) येथील हनुमान मंदिरात अज्ञातांनी चटया जाळल्या !

केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशात असे प्रकार घडत असतांना ते रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !

पाकमधील मंदिरांची तोडफोड करणार्‍या धर्मांधांना हिंदूंनी केली क्षमा !

पाकमधील हिंदूंची ही गांधीगिरी म्हणायची कि हतबलता ? पाकमधील हिंदू याव्यतिरिक्त आणखी काय करणार ? मंदिरांवर आक्रमण करणारे उद्या या हिंदूंवर आक्रमण करून त्यांना ठार करण्याची भीती असल्यानेच हिंदूंनी त्यांना क्षमा केली असावी !

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात धर्मप्रेमींकडून ट्विटरवरून #FreeHinduTemples नावाने हॅशटॅग ट्रेंड !

देशातील सध्याची मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या व्यवस्थापन समित्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे समोर येत आहे. याच्या विरोधात १४ मार्च या दिवशी सकाळी ट्विटरवर धर्मप्रेमींकडून #FreeHinduTemples नावाने हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता.

तमिळनाडूतील सहस्रावधी मंदिरांची स्थिती दयनीय ! – सद्गुरु जग्गी वासुदेव

कुठे मंदिरांना दान देऊन त्यांची देखभाल करणारे पूर्वीचे राजे, तर कुठे सरकारीकरणाद्वारे हिंदूंची मंदिरे लुटणारे, तसेच त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारे आतापर्यंतचे शासनकर्ते !

‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायद्याला आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस !

भाजपचे प्रवक्ते आणि अधिवक्ता अश्‍विनीकुमार उपाध्याय यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणीच्या वेळी बजावली नोटीस !

जिल्हा न्यायालयाकडून केंद्र, राज्य आणि ६ पक्षकार यांना उत्तर देण्याचा आदेश

हिंदूंबहुल देशात हिंदूंना त्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी न्यायालयीन किंवा अन्य स्तरांवर प्रदीर्घ लढे द्यावे लागतात, हे लज्जस्पद ! हिंदूंना त्यांचे हक्क मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

कर्नाटकातील श्री मुकाम्बिका मंदिराच्या देवनिधीची मंदिर व्यवस्थापनाकडून कोट्यवधी रुपयांची लूट !

भारतभरातील बहुतांश सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचार होतो अथवा मंदिरांचे पावित्र्य राखले जात नसल्याचे उघड झाले असतांनाही ती सरकारीकरणमुक्त होत नाहीत, हे संतापजनक !

गेल्या ७४ वर्षांत पाकमध्ये एकही नवीन मंदिर उभारले नाही !

इस्लामी देश पाकमध्ये याहून वेगळी काय स्थिती असणार ? याविषयी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत. आता भारत सरकारनेच या मंदिरांच्या आणि तेथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्यक !