पुणे येथील माँ आशापुरामाता मंदिरात चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

पुणे – येथील गंगाधाम-कोंढवा रस्त्यावरील माँ आशापुरामाता मंदिरात काही दिवसांपूर्वी रात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटीतील अनुमाने २५ ते ३० सहस्र रुपये चोरले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. या प्रकरणी दिलीप मुनोत यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.