५१ अध्यायांच्या पोथीमधून निघाला अंगारा !

कल्याण येथील स्वामीभक्ताच्या घरी घडलेली घटना !

श्री स्वामी समर्थ

पनवेल – येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधीपती सुधाकर घरत यांची कन्या कांचन सुतार यांच्या घरी समर्थांच्या ५१ अध्यायांच्या पोथीतून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत आहे. हे पहाण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक स्वामीभक्त सुतार यांच्या घरी येत आहेत. कांचन सुतार या नेहमी स्वामींना आत्मनिवेदन करत. त्या विचारत, ‘तुम्ही माझ्या घरी कधी येणार ?’ पहाटे ४ वाजता दरवाजा वाजल्याचा आवाज आला. स्वामींनी तिला सांगितले, ‘उठ, मी आलो आहे.’ कांचन देवघराच्या खोलीसमोर येताच त्यांना दरवाजापासून देव्हार्‍यापर्यंत अष्टगंध पसरल्याचे दिसले. त्यावर स्वामी समर्थांची पावले उमटली होती, तसेच मुख्य दरवाजावर समर्थांच्या हाताचे ठसे उमटले होते. आतापर्यंत पोथीमधून ५ ते ७ किलो अंगारा निघाला असून अजूनही येतच आहे.

संपादकीय भूमिका

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?