बेळगावमधील १६ मंदिरांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाच्या विरोधात श्रीराम सेना हिंदुस्थानची निदर्शने

बेळगाव (कर्नाटक) – बेळगाव शहरासह जिल्ह्यातील १६ मंदिरांवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश जिल्हा धर्मादाय विभागाने दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

” स्वतास हिंदुत्ववादी सरकार ” म्हणून घेऊन कोणतेही कारण जनतेस विश्वासात घेऊन मंदिर प्रशासन नेमणुकीचे कारण न सांगता ,

, …

Posted by Shri Ram Sena Hindustan Belgaum on Wednesday, March 3, 2021

या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष श्री. रमाकांत कोंडुस्कर म्हणाले, ‘‘धर्मस्थळ मंदिराचे विश्‍वस्त श्री. वीरेंद्र हेगडे यांनी मंदिर प्रशासक नेमणुकीस विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. असे असतांना हा आदेश देणे, हे चुकीचे आहे. या आदेशाला हिंदु धर्मियांचा तीव्र विरोध आहे. सरकार केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात का घेत आहे ? प्रशासनाने हा आदेश मागे न घेतल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.’’