श्री भवानीदेवीच्‍या अलंकारांची पडताळणी करण्‍याचे जिल्‍हाधिकार्‍यांचे आदेश !

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या अलंकारांमध्‍येच अपहार होत असेल, तर मंदिराच्‍या कारभारात किती गलथानपणा असेल ?’, याचा अंदाज यावरून येतो. त्‍यामुळे मंदिरे ही सरकारीकरणातून मुक्‍त करून भक्‍तांच्‍याच कह्यात द्यायला हवीत !

श्री भवानीदेवीचे शिवकालीन अलंकार गायब झाल्‍याचे उघड !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्‍याचा दुष्‍परिणाम ! देवीचे मौल्‍यवान दागिने सांभाळून ठेवायलाही न जमणारे अकार्यक्षम सरकारी विश्‍वस्‍त !

हिंदूंची मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्‍यासाठीही ‘हिंदु बोर्ड’ स्‍थापन करा !

सरकारने हिंदूंची मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्‍यासाठीही ‘हिंदु बोर्ड’ स्‍थापन करावे आणि त्‍यालाही विशेष सुविधा द्याव्‍यात, तरच राज्‍यघटनेमध्‍ये सांगितलेल्‍या ‘समानता’ या तत्त्वाचे पालन होईल.

गोराई (मुंबई) येथे १०० वर्षे जुने आणि जागृत श्री वांगणादेवीचे मंदिर पाडले !

पॅगोडा ज्या ठिकाणी आहे, ती भूमी मूळ मालकाने दुसर्‍याला दान केली आहे. त्यामुळे नव्या मालकाने गावकर्‍यांच्या धार्मिक भावना लक्षात न घेता मंदिरावर जेसीबी चालवला. 

 ‘कानिफनाथ मंदिर वाचवण्‍याचा कायदेशीर लढा चालू आहे आणि तो चालूच राहील’, असे भाविकांना सांगावे लागते, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद ! प्रशासन स्‍वतः कायदेशीर प्रयत्न का करत नाही ?

‘कानिफनाथ मंदिराची ४० एकर भूमी धर्मांधांनी कह्यात घेतली आहे. वर्ष २००५ मध्‍ये रंगपंचमीच्‍या दिवशी कुणालाही कळू न देता या भूमीवर वक्‍फ बोर्डाने नियंत्रण मिळवले. त्‍यानंतर एक ट्रस्‍ट बनवून त्‍याचे दर्ग्‍यात रूपांतर करण्‍यात आले.

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी बांधल्या गेल्या भव्य इमारती !

भारतात अल्पसंख्यांक मुसलमान असुरक्षित असल्याचा कांगावा करणारी अमेरिका आणि इस्लामी देश पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दुःस्थितीविषयी गप्प का ? याविषयी भारत सरकार पाकला खडसावणार का ?

आंध्रप्रदेशात सरकारीकरण झालेल्या मंदिरांची अतिक्रमण करण्यात आलेली भूमी कह्यात घेण्याचा कायदा संमत !

मूळात मंदिरांचे ‘व्यवस्थापन’ चांगले नसल्याचे सांगून सरकारकडून मंदिरे कह्यात घेतली जातात. नंतर मंदिराच्या भूमीही सरकारला सांभाळता येत नाहीत आणि त्यामुळे त्यावर अतिक्रमण होते ! हे सरकारचे कोणते ‘आदर्श व्यवस्थापन’ आहे ? त्यामुळे मंदिरे भक्तांच्याच कह्यात राहू देण्याचा कायदा असला पाहिजे !

गोवा : नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याचा प्रयत्न भक्तगणांनी सतर्कतेने हाणून पाडला !

हिंदूंची मंदिरे आता प्रशासनापासूनही असुरक्षित समजायची का ? मंदिर पाडण्यापूर्वी संबंधितांना त्याची कल्पना देणे आणि त्यामागील कारण सांगणे, अशी प्रशासनाची पद्धत आहे कि नाही ?

मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्‍त’ करण्‍यासाठी लढा देणार !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात मंदिर विश्‍वस्‍तांचा निर्धार !

मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा देणार ! – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

वस्त्रसंहिता लागू करण्यासह यापुढे मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक रहावा, यासाठी तो ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा दिला जाईल, असा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.