सनातन संस्था

या वर्षी सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सनातन संस्थेसाठी हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातन संस्था म्हणजे काय ?’ आणि ‘तिचे कार्य काय ?’, हे कळण्यासाठी सनातनच्या संस्थेच्या आध्यात्मिक कार्याची वाटचाल येथे देत आहे. 

रौप्यमहोत्सवानिमित्त सनातन संस्थेची आध्यात्मिक वाटचाल !

अनेक उच्चविद्याविभूषितांनी स्वेच्छेने नोकरी-व्यवसाय सोडून धर्मकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. शेकडो कुटुंबे सनातनशी जोडली गेली आहेत. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल !

संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन काळाची आवश्यकता ! – राजूमामा भोळे, आमदार, जळगाव

‘वन्दे मातरम्’मध्ये आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंविषयी (हवा, अन्न, पाणी) विवेचन आहे. या सर्व गोष्टींचा वापर या लोकांकडून केला जातो, तरी यास विरोध करण्याची काय आवश्यकता ?, असे प्रतिपादन भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी केले.

आनंदप्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यांसाठी साधना !

रामराज्य येण्यापूर्वी  रावणवध होणे विधीलिखित होते. रावणवधानंतरच रामराज्याची स्थापना झाली. आताही रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे अटळ आहे, किंबहुना त्याचा आरंभही झाला आहे.

सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या सहवासात पुणे येथील सौ. प्रीती कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

फेब्रुवारी २०२४ मध्ये सद्गुरु नंदकुमार जाधव गुडघेदुखीवरील उपचारांसाठी काही दिवस पुणे येथे आले होते. त्या वेळी ते सौ. वृंदा सटाणेकर यांच्या घरी वास्तव्यास होते. त्या वेळी सद्गुरु काकांच्या सहवासात सौ. प्रीती कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

धर्माचरण करणारा आणि गुरूंप्रती भाव असणारा चोपडा, जिल्हा जळगाव येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. राम कैलास व्यास (वय १६ वर्षे) !

कु. राम कैलास व्यास याला आलेल्या अनुभूती, त्याच्यात झालेले पालट आणि त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा दुसरा दिवस दिवस (२५ जून) : राष्‍ट्र आणि धर्म रक्षण यांकरिता केलेले प्रयत्न

हिंदू लहान वयात त्‍यांच्‍या मुलींना भगवद़्‍गीता का शिकवत नाहीत ? ‘परधर्मापेक्षा स्‍वधर्म श्रेष्‍ठ आहे’, याची शिकवण भगवद़्‍गीतेमध्‍ये देण्‍यात आली आहे. हे शिक्षण मिळाले, तर हिंदु युवती लव्‍ह जिहादला बळी पडणार नाहीत. कायद्याने नाही, तर संस्‍कार आणि संस्‍कृती यांमुळेच लव्‍ह जिहादला रोखता येईल.

महत्त्वाची कागदपत्रे शोधूनही न सापडणे; परंतु सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘ती कागदपत्रे कुठे आहेत ?’, ते सूक्ष्मातून पाहून अचूकपणे सांगणे

अनुमाने ७ – ८ वर्षांपूर्वी नांदूर मधमेश्वर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील ‘श्री मृग व्याघ्रेश्वर’ या महादेवाच्या मंदिराच्या विश्वस्तांनी महत्त्वाच्या कागदपत्रांची धारिका निफाड येथील हिंदु जनजागृती समितीचे सेवक श्री. धनंजय काळुंगे यांच्याकडे दिली होती…

जळगाव येथील नवनिर्वाचित भाजप खासदार स्मिता वाघ यांची सनातनच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

या वेळी सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी त्यांना सनातननिर्मित श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी सेवाकेंद्रात सनातनचे साधक उपस्थित होते.

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका, तुमच्या कृपेने ‘साधना हेच सत्य’ हे ओळखण्यास मी सिद्ध होईन ।

ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (१४.६.२०२४) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा ७२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेने त्यांच्या चरणी अर्पण केलेले काव्य येथे दिले आहे.