आंध्रप्रदेशात सरकारीकरण झालेल्या मंदिरांची अतिक्रमण करण्यात आलेली भूमी कह्यात घेण्याचा कायदा संमत !

मूळात मंदिरांचे ‘व्यवस्थापन’ चांगले नसल्याचे सांगून सरकारकडून मंदिरे कह्यात घेतली जातात. नंतर मंदिराच्या भूमीही सरकारला सांभाळता येत नाहीत आणि त्यामुळे त्यावर अतिक्रमण होते ! हे सरकारचे कोणते ‘आदर्श व्यवस्थापन’ आहे ? त्यामुळे मंदिरे भक्तांच्याच कह्यात राहू देण्याचा कायदा असला पाहिजे !

गोवा : नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याचा प्रयत्न भक्तगणांनी सतर्कतेने हाणून पाडला !

हिंदूंची मंदिरे आता प्रशासनापासूनही असुरक्षित समजायची का ? मंदिर पाडण्यापूर्वी संबंधितांना त्याची कल्पना देणे आणि त्यामागील कारण सांगणे, अशी प्रशासनाची पद्धत आहे कि नाही ?

मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्‍त’ करण्‍यासाठी लढा देणार !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात मंदिर विश्‍वस्‍तांचा निर्धार !

मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा देणार ! – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

वस्त्रसंहिता लागू करण्यासह यापुढे मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक रहावा, यासाठी तो ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा दिला जाईल, असा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

काशी विश्‍वेश्‍वराची मुक्‍ती होईल, तेव्‍हा देश अखंड हिंदु राष्‍ट्र होईल ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात पार पडलेले ‘मंदिरमुक्‍ती अभियान’ सत्र

हिंदूंची सर्व मंदिरे परत मिळवणे, हा आमचा प्रण आहे ! – अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय तथा संरक्षक, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

महाराणा प्रताप, शिख धर्मगुरु यांनी हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलीदान केले; पण पराभव स्वीकारला नाही. आपल्याला त्यांच्याहून अधिक संघर्ष करून हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. तरच त्या धर्मयोद्ध्यांना शांती मिळेल.

मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या द्वितीय दिवशी (१७.६.२०२३ या दिवशी) दुसर्‍या सत्रामध्ये ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . .

आक्रमकांनी नष्ट केलेल्या देशातील सर्व मंदिरांचा केंद्र सरकारने जीर्णोद्धार करावा !

संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरे जपली पाहिजेत. यासाठी गोवा येथे गोमंतक मंदिर महासंघ काम करत आहे, तर महाराष्ट्रात महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात मान्यवरांनी केलेली भाषणे

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची अवहेलना प्रतिदिन चालू आहे. हा मंदिरांच्या सरकारी अधिग्रहणाचा दुष्परिणाम आहे, हे लक्षात घेऊन लवकरात लवकर ही मंदिरे सरकारमुक्त करणे, हाच यावरील एकमात्र उपाय आहे.

देशातील हिंदु मंदिरे आणि त्‍यांच्‍या संरक्षणासाठी हिंदूसंघटनाचे महत्त्व !

मेकॉलेच्‍या शिक्षणपद्धतीचा एवढा परिणाम भारतियांमध्‍ये भिनला आहे की, आम्‍ही देहाने जरी हिंदु असलो; परंतु आमची बुद्धी मात्र इंग्रजाळलेली आहे. भारताचा भूतकाळ अत्‍यंत गौरवशाली आहे आणि तो आपण जाणून घेतला पाहिजे. जर आपण दक्षिण भारतातील मंदिरे पाहिली, आमच्‍या पुराणकालीन मंदिरांना पाहिले, तर लक्षात येईल की, ती आपण सहस्रो वर्षांपूर्वी बांधली आहेत.