नगर, २८ डिसेंबर (वार्ता.) – अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील गुहा गावातील श्री कानिफनाथ देवस्थान येथे काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी वारकर्यांवर आक्रमण केले होते, त्या ठिकाणी ग्रामस्थांनी श्री कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. २८ डिसेंबर या दिवशी या मूर्तीची स्थापना करण्यात आली असून ‘मूर्ती प्रकट झाली अशी’ भाविकांची भावना आहे. मूर्ती प्रकट झाल्यानिमित्त गुहा पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी देवस्थानमध्ये एकत्र श्री कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात महाआरती करून आनंदोत्सव साजरा केला.
२८ डिसेंबर या दिवशी गुहा पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून ‘श्रीराम अक्षता कलश मिरवणूक’ आयोजित करण्यात आली होती. श्री कानिफनाथ देवस्थानमध्ये श्री कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याचे वृत्त समजताच अक्षता मिरवणुकीसाठी जमलेल्या सर्व भाविकांनी श्री कानिफनाथ देवस्थानच्या ठिकाणी मिरवणूक आणून श्री कानिफनाथ महाराजांचे यथासांग पूजन केले. या वेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हेही उपस्थित होते.
काय आहे कानिफनाथ देवस्थानाचा वाद ?
येथील श्री कानिफनाथ महाराज मंदिराची जागा वक्फ बोर्डद्वारे बळकावण्याचा प्रयत्न धर्मांध करत आहेत. १३ नोव्हेंबर या दिवशी या मंदिरात भजन करणार्या वारकर्यांवर काही मुसलमान समाजकंटकांनी आक्रमण करून टाळ, मृदंग यांची तोडफोड केली होती. येथील हिंदु पुजारी आणि वारकरी यांना धर्मांधांनी मारहाणही केली होती. या प्रकरणी २१ नोव्हेंबर या दिवशी समस्त धर्मप्रेमी हिंदूंनी या ठिकाणी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला होता.
संपादकीय भूमिका :हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे वक्फ बोर्डाने गिळंकृत केलेल्या सहस्रो एकर भूमी कधी कह्यात घेणार ? |