India Russia Relations : ‘रशियाशी चांगले संबंध आहेत’, या कारणामुळे भारतावर दबाव आणणे अयोग्य ! – सर्गेई लॅवरोव्ह, परराष्ट्रमंत्री, रशिया

माझा विश्‍वास आहे की, भारत ही एक महान शक्ती आहे, जी स्वतःचे राष्ट्रीय हित ठरवते आणि स्वतःचे भागीदार निवडते. आम्हाला ठाऊक आहे की, भारतावर प्रचंड दबाव आहे, जो पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह यांनी केले आहे.

Teesta Development Project : बांगलादेशाने तिस्ता नदीशी संबंधित प्रकल्पाचे काम चीनऐवजी भारताला दिले !

बांगलादेशाने तिस्ता नदीशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पासाठी चीनची नव्हे, तर भारताची निवड केली आहे. १०० कोटी डॉलरचा हा प्रकल्प भारत पूर्ण करणार असल्याची घोषणा पंतप्रधान शेख हसीना यांनी केली आहे.

माझ्याविरुद्ध गुन्हा नोंदवला कि नाही ?, याचे उत्तर मला पोलिसांकडून अद्यापही मिळालेले नाही ! – माजी खासदार छत्रपती संभाजीराजे

काल विशाळगडावर जो प्रकार झाला, त्या संदर्भात शाहूवाडी पोलीस ठाण्यात शिवप्रेमींविरुद्ध गुन्हा नोंदवल्याचे मला कळाले. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी मी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गेलो होतो. तेथे मी दीड घंटा उपस्थित होतो.

मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा दबाव ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

मनोज जरांगे यांची १३ जुलै या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे शांतता फेरी पार पडली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

Sri Ram Sena Helpline : श्रीराम सेनेच्या हेल्पलाईन क्रमांकाचा हिंदु महिलांना होत आहे लाभ ! – प्रमोद मुतालिक

हिंदु महिलांच्या रक्षणासाठी हुब्बळ्ळीसह राज्यातील ४ ठिकाणी श्रीराम सेनेने चालू केलेला हेल्पलाईन क्रमांक परिणामकारक रीतीने कार्य करत आहे, अशी माहिती श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या प्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदु समाजाची दिशाभूल करू नये ! – कुंदन पाटील, सकल हिंदु समाज

छत्रपती संभाजीराजे हे ६ वर्षे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते, तेव्हा त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणांविषयी कधीही आवाज उठवला नाही. ते रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष होते, तेव्हाही या अतिक्रमणांविषयी त्यांनी कधी आवाज उठवला नाही.

पू. भिडेगुरुजींवर टीका केल्यास धारकरी जशास तसे उत्तर देतील !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभागप्रमुख हणमंतराव पवार यांची चेतावणी

शुद्ध प्रसाद मिळण्‍यासाठी देशभरातील मंदिर परिसरातील हिंदु दुकानदारांनी ‘ओम प्रमाणपत्र’ घ्‍यावे ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगणा

बाहेरगावाहून आलेल्‍या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो ?, हे माहिती नसते. त्‍यामुळे सध्‍या केवळ हिंदु दुकानदारांना प्रसादशुद्धीसाठी ‘ओम प्रमाणपत्र’ वितरित करण्‍याचा उपक्रम चालू करण्‍यात आला आहे.

वक्‍फ बोर्डप्रमाणे हिंदु मंदिरांसाठी सर्वाधिकार देणारे ‘मंदिर बोर्ड’ स्‍थापन करा ! – अधिवक्‍ता विष्‍णु जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या पाचव्‍या दिवशी पत्रकार परिषद विद्याधिराज सभागृह – ज्‍या प्रमाणे मुसलमानांच्‍या धार्मिक मालमत्ता आणि भूमी संरक्षित करण्‍यासाठी तत्‍कालीन काँग्रेस सरकारने वक्‍फ बोर्ड स्‍थापन करून त्‍याला विशेष कायदेशीर अधिकार दिले आहेत, त्‍याच धर्तीवर देशभरातील हिंदूंची लाखो मंदिरे, त्‍यांची भूमी आणि संपत्ती संरक्षित करण्‍यासाठी वक्‍फ बोर्डाप्रमाणे मंदिरांसाठी सर्वाधिकार असलेला ‘हिंदु मंदिर बोर्ड’ स्‍थापन करण्‍यात … Read more

‘खोटे बोल पण रेटून बोल’, अशी विरोधकांची मानसिकता आहे ! – मुख्यमंत्री

लोकसभेतील विजयामुळे विरोधक छाती फुगवून प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत; पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नाही. आम्हाला दिलेल्या पत्रात कोणतीही सूत्रे नाहीत. तीच तीच सूत्रे त्या पत्रात मांडली जात आहेत.