Claim Ajmer Dargah As Shiva Temple : अजमेरचा दर्गा हे शिवमंदिर आहे; आम्ही ते परत घेऊ ! – अखिल भारतीय हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता

(दर्गा म्हणजे मुसलमानांच्या कथित सिद्धपुरुषांचे समाधीस्थळ)

अखिल भारतीय हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता

अजमेर (राजस्थान) – अजमेरचा दर्गा हे खरे तर शिवमंदिर आहे. या मंदिराची विटंबना करण्याचे दुष्कृत्य आतंकवाद्यांनी केले आहे. आता या शिवमंदिराला पुन्हा मूळ स्वरूपात आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी आपण न्यायालयाचे साहाय्य घेणार आहे, असे अखिल भारतीय हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी सांगितले. वैशालीनगर येथील तपस्वी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. विष्णु गुप्ता म्हणाले की, दर्ग्याविषयी न्यायालयात प्रलंबित असलेला खटला ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’ कायद्याच्या अंतर्गत येत नाही; कारण हा कायद्यामध्ये केवळ मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा आणि चर्च यांचा समावेश आहे, जी प्रार्थनास्थळे आहेत आणि दर्गा यांपैकी कोणत्याही प्रकारात येत नाही. दर्गा हे प्रार्थनास्थळ नाही. त्यामुळे ते उपासना कायद्यांतर्गत येत नाही. त्याचे सर्वेक्षण करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार आहे, असे विष्णु गुप्ता यांनी सांगितले.

१. विष्णू गुप्ता म्हणाले, ‘‘मी सनातनी असल्याने मला अजमेर दर्गा मंदिरावर दावा ठोकण्याचा घटनात्मक अधिकार आहे आणि माझ्याकडे पुरेसे पुरावेही आहेत.’’

२. पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले विश्‍व हिंदु पीठ हरिद्वारचे अध्यक्ष मदन आचार्य म्हणाले की, ११ व्या शतकापूर्वी भारतात एकही मशीद किंवा दर्गा नव्हता, मोगल शासकांनी येथे येऊन मंदिरे पाडली आणि मशिदी बांधल्या.

३. सनातन धर्म रक्षक संघ अजयमेरू राजस्थानचे अध्यक्ष माजी न्यायाधीश अजय शर्मा, सनातन संघाचे संयोजक तरुण वर्मा, सनातन धर्म रक्षा संघाचे माध्यम सल्लागार विजय कुमार शर्मा यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित केले.

संपादकीय भूमिका

भारतातील वादग्रस्त मशिदी आणि दर्गे यांचे सर्वेक्षण करून तेथे पूर्वी मंदिरे असल्यास ते हिंदूंना सोपवण्यासाठी आता केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !