(म्हणे) ‘बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (‘एन्.आर्.सी.’) लागू केल्यास संपूर्ण भारत पेटेल ! – लष्कर-ए-तोयबा

‘लष्कर-ए-तोयबा’च्या नावाने केंद्रीय मंत्र्यांना धमकीचे पत्र !

शंतनू ठाकूर

कोलकाता (बंगाल) – ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेने बंगालमधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (‘एन्.आर्.सी.’च्या) सूत्रावरून केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांना धमकीचे पत्र पाठवले आहे. शंतनू ठाकूर यांनी दावा केला की, हे पत्र त्यांना ८ एप्रिल या दिवशी नजरुल इस्लाम साहिब अली आणि फैज अली नावाच्या व्यक्तींनी पोस्टाने पाठवले होते. धमकीचे पत्र उत्तर २४ परगणा येथील देगंगा येथील हदीपूर गावातून पाठवण्यात आले आहे.

सौजन्य : News18 India

१. बंगाली भाषेत लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे, मी तुम्हाला सांगतो की, जर बंगालमध्ये ‘एन्.आर्.सी.’ लागू करण्यात आला आणि त्यामुळे मुसलमानांवर अत्याचार झाले, तर बंगाल आणि संपूर्ण भारत पेटेल. तुमचे टागोर हाऊस उडवले जाईल. ठाकूरबारीत कोणत्याही व्यक्तीला राहू दिले जाणार नाही. तुम्ही लष्कर-ए-तोयबाचे नाव ऐकले आहे का ? आम्ही लष्कर-ए-तोयबाचे सदस्य आहोत.

२. शंतनू ठाकूर म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, आतंकवादी संघटना अशा प्रकारे राज्याचे खासदार आणि मंत्री यांना धमकावू शकत नाही. बंगालमध्ये लोकशाहीविरोधी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा आतंकवादी गटांना तृणमूल काँग्रेसच्या पाठिंब्यावर पोसले जात आहे आणि ते आम्हाला धमक्या देत आहेत. मी गृहमंत्र्यांना सांगेन. मला न्याय हवा आहे, ही घटना बंगालसाठी अत्यंत लज्जास्पद आहे.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकारची धमकी आतंकवादी संघटनेच्या नावाने अन्य कुणी देत आहे का ? याची आधी चौकशी करणे आवश्यक आहे !