बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ईदच्या कार्यक्रमात राष्ट्रविघातक विधान !
(सीएए म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा, तर एन्.आर्.सी. म्हणजे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी)
कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि समान नागरी कायदा लागू करू देणार नाही, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. ‘निवडणुकीत काही लोक दंगल घडवण्याचा प्रयत्न करतील; पण तुम्ही त्यांच्या फंदात पडू नका’, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. (हिंदूंच्या सणांच्या वेळी तृणमूल काँग्रेसचे धर्मांध मुसलमान कार्यकर्तेच दंगली घडवत असतात, याविषयी ममता बॅनर्जी यांनी बोलावे ! – संपादक)
सौजन्य India Today
ममता बॅनर्जी म्हणाल्या की,
१. या निवडणुकीत काही लोकांना अन्वेषण यंत्रणांचा धाक दाखवून जनतेला घाबरवायचे आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचालनालय, आयकर विभाग इत्यादींना काही लोकांच्या मागे लावण्यात आले आहे. मी (त्यांना) सांगेन की, तुम्ही अनेक ठिकाणी कारागृहे बांधून सर्वांना त्यात डांबा; पण तुम्ही १३० कोटी लोकांना कारागृहात टाकू शकाल का ? मी देशासाठी रक्त सांडायला सिद्ध आहे; पण हे अत्याचार खपवून घेणार नाही. (बंगालमध्ये धर्मांध मुसलमान हिंदूंवर अत्याचार करत आहेत, शेजारील बांगलादेशातही बंगाली हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्याविषयी ममता बॅनर्जी कधी एक शब्दही बोलत नाहीत ! – संपादक)
Bengal Chief Minister Mamata Banerjee's anti-national outburst at an #EidUlFitr program.
Will not allow CAA, NRC and the #UniformCivilCode in Bengal.
👉 Being CM of Bengal, Mamata Banerjee is defying the laws that are democratically approved in the parliament.
The Governments… pic.twitter.com/PbcztQKCle
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 11, 2024
२. निवडणुका जवळ आल्या असतांना देशातील काही मुसलमान नेत्यांना दूरभाष करून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीच्या काळात तुम्ही (भाजप) काही मुसलमान लोकांची निवड करत आहात आणि त्यांना काय हवे ते विचारत आहात. मी तुम्हाला सांगतो की, त्यांना काहीही नको आहे.
३. जर कुणी दंगल भडकवायला येत असेल, तर तुम्ही शांत रहा; कारण स्फोट झाला, तर ते राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला पाठवतील आणि सर्वांना अटक करतील. सर्वांना अटक केल्यास देश उजाड होईल. सर्वांनी एकत्र रहावे, अशी आमची इच्छा आहे. आपण संघटित राहिलो, तर कुणीही आपली हानी करू शकणार नाही.
४. तृणमूल काँग्रेसची लढाई भाजपशी आहे. आम्ही ‘इंडी’ आघाडीशी युती करायची कि नाही, हे निवडणुकीनंतर ठरवू; मात्र बंगालमध्ये अन्य कोणत्याही पक्षाला मते देऊ नका.
संपादकीय भूमिका
|