बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरमुक्त महाराष्ट्रासाठी ‘जनता एन्.आर्.सी. अभियान’ !

(एन्.आर्.सी. म्हणजे राष्ट्रीय नागरिकता नोंदणी)

डावीकडून स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, डॉ. सुरेश चव्हाणके, श्री. मिलिंद एकबोटे

पुणे, २५ ऑगस्ट (वार्ता.) – महाराष्ट्रात घुसखोर रोहिंग्या, बांगलादेशी मुसलमानांच्या वाढत्या संख्येवर तात्काळ उपाय म्हणजे अवैध घुसखोर ओळखून त्यांना देशाबाहेर घालवणे. यासाठी सरकारने एन्.आर्.सी.ची कार्यवाही करावी; मात्र सरकार तसे करू शकत नाही, हे लक्षात आल्याने महाराष्ट्रातील सकल हिंदु समाजाने स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण महाराष्ट्र घुसखोरमुक्त करण्यासाठी जनता एन्.आर्.सी.च्या माध्यमातून घुसखोरमुक्त, रोहिंग्यामुक्त महाराष्ट्र हे अभियान राबवले जाणार आहे. याची पहिली सभा २४ ऑगस्ट या दिवशी पुण्यातील श्रुती मंगल कार्यालय येथे पार पडली. या सभेला ‘सुदर्शन वाहिनी’चे संपादक सुरेश चव्हाणके, श्री. मिलिंद एकबोटे, स्वामी भारतानंद सरस्वती यांनी उपस्थितांना संबोधित केले.


जनता एन्.आर्.सी.ची आवश्यकता आणि मुसलमानांची सद्य:स्थिती ! – सुरेश चव्हाणके

देशाच्या लोकसंख्येच्या ११ टक्के मुसलमान आहेत; परंतु वर्ष २०२४ च्या निवडणुकीत मुसलमानांचे मतदान २२ टक्के झाले. वर्ष २०२९ नंतर हिंदु पंतप्रधान बनणे अवघड होईल. मुसलमानांचा जन्मदर हिंदूंच्या चौपट आहे. मुंबईत १० वर्षांनी हिंदू नामशेष झालेले असतील. या जनअसंतुलनावर उपाय म्हणजे जनता एन्.आर्.सी. ! या जनआंदोलनाचा आरंभ महाराष्ट्रातूनच करण्याचे कारण महाराष्ट्राला इतिहास आहे. ३१७ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे ७५ टक्के लोकांचे स्थानांतर झाले. हिंदू पळून गेले किंवा धर्मांतरित झाले; पण याच महाराष्ट्रातून अटकेपार झेंडा फडकावला गेला. ज्योतिषशास्त्रानुसार १०० वर्षांतून येणारा असा संकल्प करण्याचा हा काळ, हाच तो महाराष्ट्र आणि हीच ती पुण्यभूमी आहे. म्हणून येथूनच आज जनता एन्.आर्.सी.चा  संकल्प करूया, असे प्रतिपादन श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले.