हिंदूंना न्याय मिळण्यासाठी देशात ‘एन्.आर्.सी.’ लागू झालीच पाहिजे ! – डॉ. सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी
महाराष्ट्र राज्य ‘घुसखोरांचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाऊ नये, यासाठी हिंदूंनी वेळीच जागृत व्हावे !
महाराष्ट्र राज्य ‘घुसखोरांचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाऊ नये, यासाठी हिंदूंनी वेळीच जागृत व्हावे !
‘नुकताच प्रयागराज येथील महाकुंभमेळा झाला. गेल्या काही महत्त्वाच्या कुंभमेळ्यानंतर जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर काही मोठे पालट झाले आहेत.
सनातन धर्मामध्ये महिलांना देवीच्या रूपात पूजण्याची परंपरा सर्वांत प्राचीन आणि गहन आहे. इथे स्त्रीला केवळ मातृत्वापर्यंत सीमित केलेले नाही, तर तिला शक्ती, ज्ञान आणि भक्ती यांचे प्रतीक मानले गेले आहे.
कुंभमेळ्यात साधू संत आणि आखाडे यांच्याद्वारे केले जाणारे शाहीस्नान (अमृतस्नान), हे कुंभमेळ्यातील सर्वात महत्त्वपूर्ण अनुष्ठानांपैकी एक आहे. आता याचे नाव पालटून ‘अमृतस्नान’ करण्यात आले आहे.
हिंदु धर्मामध्ये धर्मग्रंथ हे केवळ पवित्र ग्रंथ नाहीत, तर ते जीवनाविषयीचे मार्गदर्शन, आत्म्याची शुद्धी आणि मोक्षप्राप्ती यांचे साधन आहेत. सनातन धर्मातील सर्वांत भव्य असलेला कुंभमेळा हा या ग्रंथातील शिकवणीचे सार आणि सजीव उत्सव आहे.
महाकुंभमेळा हे केवळ धार्मिक आयोजन नाही, तर दिव्य वैज्ञानिक भक्ती आणि अतीउच्च कोटीच्या साधनेचा महासंगम आहे, ज्या ठिकाणी व्यक्तीच नव्हे, तर चराचर आपल्या आतील सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात.
आखाडे समाजातील युवकांना धर्म आणि संस्कृती यांच्याविषयी जागृत करत आहेत. काही आखाडे युवकांना अमली पदार्थांपासून मुक्ती आणि मानसिक स्वास्थ्य यांसाठी प्रेरित करत आहेत.
कानपूर, फतेहपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख श्यामप्रकाशजी यांनी प्रदर्शनाला भेट दिली. समितीने लावलेले प्रदर्शन पाहून त्यांनी त्यांच्या भागातही ‘असे प्रदर्शन लावून धर्मशिक्षणवर्ग चालू करा’, अशी मागणी केली.
‘सुदर्शन न्यूज’च्या डॉ. सुरेश चव्हाणके यांनी सनातन संस्थेच्या सेक्टर ९ येथील प्रदर्शनकक्षाला २९ जानेवारी या दिवशी भेट दिली. या वेळी त्यांनी प्रदर्शन समजून घेण्यासह साधकांशीही चर्चा केली. या वेळी त्यांनी पूर्ण प्रदर्शनाचे छायाचित्रीकरण करून घेतले.
‘सुदर्शन वाहिनी’चे संपादक सुरेश चव्हाणके आणि शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची सपत्नीक कुंभमेळ्यातील सनातनच्या प्रदर्शनाला भेट ! सनातन संस्थेच्या धर्मप्रचारकार्याचे केले कौतुक !