आसाममधील अनेक जिल्ह्यांत हिंदूच अल्पसंख्य ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – राज्यात हिंदू बहुसंख्य नसतील, तर त्यांना ‘अल्पसंख्य’ घोषित केले जाऊ शकते. मी आवाहन करतो की, राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये हिंदू ‘बहुसंख्य’ नाहीत, त्या जिल्ह्यांमध्ये तरी किमान हिंदूंना ‘अल्पसंख्य’ घोषित करण्यात यावे. आसाम राज्यात असे अनेक जिल्हे आहेत, जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत. त्यातही काही जिल्ह्यांत हिंदूंची संख्या ५ सहस्रांहूनही अल्प आहे आणि तेथे मुसलमान बहुसंख्य आहेत. हे माझे वैयक्तिक मत नाही, तर आकडेवारीच तशी आहे, अशी माहिती आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली.

१. मुख्यमंत्री सरमा यांनी या वेळी राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची (‘एन्.आर्.सी.’ची) समीक्षा करण्याचीही मागणी केली. ते म्हणाले की, ‘ऑल असम स्टूडेंट्स यूनियन’ (आसू) यांच्याशी आमची चर्चा चालू आहे. आम्हाला वाटते की, राज्यात पुन्हा राष्ट्रीय नागरिकता नोंदणी करण्यात यावी.

२. ऑगस्ट २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रीय नागरिकता नोंदणी करण्यात आली होती. त्यात ३ कोटी ३० लाख लोकांनी अर्ज केले. त्यांपैकी १९ लाख ६ सहस्र लोकांना बाहेर काढण्यात आले होते.