ऑक्सफर्डचा हिंदुद्वेष !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची झूल पांघरणार्‍या विद्यापिठांची तत्त्वे किती पोकळ आणि बेगडी असतात, हे जगासमोर उघड व्हायला हवे. भारतात ऑक्सफर्डच्या तोडीची विद्यापिठे निर्माण झाली, तर विदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ अल्प होईल आणि त्या वेळीच खर्‍या अर्थाने ऑक्सफर्डसारखी विद्यापिठे ताळ्यावर येतील !

‘धर्मनिरपेक्षते’चे ढोंग !

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांचा लाळघोटेपणा म्हणा अथवा लांगूलचालन म्हणा, या सर्वांचे दुसरे नाव म्हणजेच ‘राष्ट्रीय काँग्रेस’ होय. काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १३५ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आरंभीची काही वर्षे सोडली, तर काँग्रेसचा हाच एककलमी कार्यक्रम राहिलेला आहे

सर्कोझी आणि व्यवस्था !

​भारत महासत्तेच्या दिशेने पावले टाकत आहे. यासाठी भारतात बोकाळलेला भ्रष्टाचार हा मोठा अडसर आहे. विकसित देश तो निपटण्यासाठी काय करतात, याचा अभ्यास हवा आणि त्या अभ्यासातून पुढे आलेल्या सूत्रांची कार्यवाही करण्यासाठी धडाडीही दाखवायला हवी. असे केले, तरच भ्रष्ट राजकारण्यांवर वचक बसेल.

म्यानमारचा लष्करी सत्तापालट !

९० टक्के बौद्ध नागरिक असणार्‍या म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हाती घेतल्यापासूनच जनतेने तीव्र विरोध चालू केला आणि १ मास संपून आताही तो चालू आहे. लष्कराच्या हाती सत्ता आल्यावर तेथील लोक म्हणालेे, ‘‘एका रात्रीत त्यांचे आयुष्य उलटसुलट पालटून गेले.’’

हिंदूंसाठी अजूनही काश्मीर असुरक्षित !

काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील अत्यंत संवेदनशील भागात असणार्‍या कृष्णा ढाब्यावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ढाब्याच्या मालकाचा मुलगा घायाळ झाला होता. त्याचा उपचार चालू असतांना मृत्यू झाल्यावर हिंदूंमध्ये पुन्हा संतापाची लाट उसळली.

इस्रोची पुन्हा गगनभरारी !

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) २८ फेब्रुवारी या दिवशी अवकाशात ‘पी.एस्.एल्.व्ही. – सी ५१’ या वाहकाच्या माध्यमातून १९ उपग्रह प्रक्षेपित केले. यामध्ये ब्राझिलच्या ‘अ‍ॅमेझोनिया – १’ या उपग्रहाचा समावेश असून १८ व्यावसायिक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.

असुरक्षित मुंबई !

काही दिवसांपूर्वी मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवलेली गाडी आढळली होती. त्याविषयी मुंबई, महाराष्ट्रातील सुरक्षायंत्रणांसह राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा अन्वेषण करीत आहेत.

भारतीयत्वाच्या रक्षणार्थ सिद्ध व्हावे !

बहुसंख्यांक असलेल्या हिंदु समाजाचा विचार केल्यास आपल्याकडे #HinduLivesMatter या नावाने मोहिमा, आंदोलने, ऑनलाईन अभियान राबवावी लागतात. एकंदरीत, या तीनही राज्यांतील हिंदूंनी भारतीयत्वाच्या रक्षणार्थ स्वतःचे मत देणे, ही काळाची निकड आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसायला हवी, हेच खरे !

खलिस्तानी आतंकवादाची पुनरावृत्ती !

खलिस्तानी चळवळीचे कंबरडे वेळीच मोडायला हवे आणि खलिस्तान्यांचाही समूळ नायनाट करायला हवा. जिहादी किंवा खलिस्तानी आतंकवादी असोत, त्यांचे समूळ उच्चाटन करणे, हे भारतासाठी क्रमप्राप्त आहे.

प्रगती कि अधोगती ?

आज वाढत चाललेल्या आत्महत्या ही जगासाठी डोकेदुखी किंबहुना धोक्याची घंटा असल्याचे सिद्ध होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ‘जगात प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. वर्षाकाठी अनुमाने ८ लाख लोक आत्महत्या करतात.