घाटकोपर येथे अल्पवयीन मुलाकडून अंकुश भालेराव यांची हत्या !

अल्पवयीन मुलासह त्याचा मोठा भाऊ महंमद सन्नाउल्ला याला अटक

अंकुश भालेराव (चौकोनामध्ये)

मुंबई – येथील घाटकोपर रेल्वे स्थानकावर हाणामारीत अंकुश भालेराव यांची हत्या करण्यात आली. लोकलमधील आसनाच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवत अल्पवयीन मुलाने हिंदु प्रवाशावर चाकूने जीवघेणे आक्रमण केले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दलाच्या पोलिसांनी घायाळ प्रवाशाला तातडीने रुग्णालयात नेले होते; पण आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला हत्येच्या आरोपाखाली आणि त्याचा भाऊ महंमद सन्नाउल्ला उपाख्य सोहेल याला घटनेशी संबंधित पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली गोवंडी येथून अटक करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने महंमदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका 

अल्पवयीन मुलाच्या हातात चाकू कसा आला ? याविषयी कुणी काही बोलत नाही, हे लक्षात घ्या !