टिळा लावणे आणि ‘जय श्रीराम’ म्हणणे यांपासून प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना थांबवले !

  • कांगडा (हिमाचल प्रदेश) येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानातील घटना

  • विद्यार्थ्यांकडून आंदोलन, हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडूनही निषेध व्यक्त

शिमला (हिमाचल प्रदेश) – राष्ट्रीय संस्कृत संस्थानाच्या विद्यार्थ्यांनी राज्यातील कांगडा जिल्ह्यात असलेल्या बलाहार येथे आंदोलन केले. संस्थानातील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावण्यावरून आणि ‘जय श्रीराम’ म्हणण्यावरून मज्जाव केल्याने विद्यार्थी संतप्त झाले होते. या घटनेवरून विद्यार्थी आंदोलन करत होते. येथील विश्‍व हिंदु परिषद आणि अन्य संघटन यांच्या हिंदुत्वनिष्ठांनीही विद्यार्थ्यांचे समर्थन केले आहे.

१. विद्यार्थ्यांनी यापूर्वी संस्थानाचे संचालक प्रा. सत्यम कुमारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी शिस्तपालन समितीकडे या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते.

२. कोणत्या प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना धर्मपालन करण्यापासून रोखले, हे अद्याप समोर आलेले नाही.

३. संबंधित प्राध्यापकाने म्हटले की, ‘जय श्रीराम’ म्हणणे राजकीय आहे. प्राध्यापकाच्या या वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. त्यांनी प्राध्यापकावर गैरवर्तन आणि भेदभाव केल्याचा आरोपही केला आहे.

४. विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जागरण मंच आणि ब्राह्मण सभा यांसारख्या इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर निषेध केला आहे. त्यांनी ‘जय श्रीराम’ची घोषणा देत प्रभु श्रीरामाचे भजनही गायले.

५. संस्थानाच्या प्रा. कुमारी म्हणाल्या की, आम्हाला विद्यार्थ्यांची तक्रार प्राप्त झाली असून एक शिस्तपालन समिती स्थापन करण्यात आली आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थी या दोघांनाही समितीसमोर आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. प्राध्यापकांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

‘जय श्रीराम’ची घोषणा राष्ट्रीय संस्कृत संस्थानात नाही देणार, तर मग काय ‘जामिया मिलिया इस्लामिया’ अथवा ‘अलीगड मुस्लिम विद्यापीठ’ येथे द्यायची का ? हिंदूंच्याच देशात त्यांनाच हिंदु धर्मानुसार आचारण करू न देणे, हे संतापजनक !