‘इस्रो’च्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; मात्र संपर्क तुटला !
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून देशभरातील ७५ शाळांतील ७५० विद्यार्थ्यांनी ‘आझादी सॅट’ हा उपगृह सिद्ध केला आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून देशभरातील ७५ शाळांतील ७५० विद्यार्थ्यांनी ‘आझादी सॅट’ हा उपगृह सिद्ध केला आहे.
भारताचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘गगनयान’ची संकल्पना यशस्वी करण्यासाठी ‘इस्रो’ने नुकतेच ‘ह्यूमन रेटेड सॉलिड रॉकेट बूस्टर’चे यशस्वी परीक्षण केले. यामुळे मनुष्याला अंतराळात दीर्घकाळ रहाणे शक्य होणार आहे.
इस्रोला खासगी लोकांसाठी मोकळीक दिल्यानंतर ही नोंदणी झाली आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहांना अंतराळात पाठवण्याची संधी देण्याची योजना आहे’, अशी माहिती डॉ. सिंह यांनी दिली.
शुक्र मोहिमेसंदर्भात विचार झाला आहे, तिचा प्रकल्प अहवाल सिद्ध करण्यात आला आहे आणि तिच्यासाठी निधी मिळणे निश्चित झाले आहे, असे इस्रोचे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी सांगितले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् ‘इस्रो’ने येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील पहिल्या प्रक्षेपण केंद्रावरून ‘अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट’ अर्थात् ‘पृथ्वी निरीक्षण उपग्रह’ आणि ‘इस्रो’चे अन्य २ उपग्रह यांचे यशस्वी प्रक्षेपण केले.
भारताचा बहुचर्चित ‘गगनयान’ मोहीम वर्ष २०२३ मध्ये राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भारताचे ३ अंतराळवीर ७ दिवस अंतराळात रहाणार आहेत.
भारताचा सध्याच्या पहिल्या क्रमांकांचा शत्रू असणार्या देशाच्या आस्थापनाशी ‘इस्रो’सारख्या महत्त्वाच्या संस्थेने करार करणे, हे भारतियांना अपेक्षित नाही. याविषयी भारत सरकारने जनतेला माहिती द्यायला हवी !
पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर हा उपग्रह कार्यरत असणार आहे.
देशात प्रथमच, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (‘इस्रो’च्या) व्यतिरिक्त खासगी आस्थापनेही ‘पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल’बनवू शकणार आहेत.
या उपग्रहाचे प्रक्षेपण यापूर्वी ३ वेळा स्थगित करण्यात आले होते. या उपग्रहाद्वारे भारतासह चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार होते.