मुंबई, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – मुसलमानबहुल असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ‘मालेगाव मध्य’ मतदारसंघात एकूण १३ उमेदवार उभे होते. हा मतदारसंघ मुसलमानबहुल असल्यामुळे येथे सर्व मुसलमान उमेदवार उभे करण्यात आले होते.
‘मालेगाव मध्य’ या मतदारसंघातून ‘मजलीस ए इत्तेहादुल मुस्लमीन’ म्हणजेच ‘एम्.आय्.एम्.’ पक्षाचे उमेदवार मुफ्ती महंमद इस्माईल अब्दुल खालीक विजयी झाले. त्यांनी ‘इंडियन सेक्युअर लार्जेस्ट ॲसेब्ली ऑफ महाराष्ट्र’ पक्षाचे उमेदवार असीफ शेख रशीद यांचा १६२ मतांनी पराभव केला. या मतदारसंघामध्ये महायुतीकडून उमेदवार उभा करण्यात आला नव्हता. महाविकास आघाडीकडून काँग्रेस, समाजवादी पक्ष, सोशिअल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, ‘मायनॉरिटी डेमाक्रॅटिक पार्टी’ आदी पक्षांनी येथे मुसलमान उमेदवार उभे केले होते. या मतदारसंघात ७ अपक्ष उमेदवार उभे होते.
संपादकीय भूमिकाभविष्यात महाराष्ट्रासह देशात मुसलमानबहुल भागांमध्ये वाढ झाल्यास काय स्थिती होईल, याचा हिंदूंनी विचार करावा ! |